गुढीपाडव्याचा उत्साह, शोभायात्रांची रेलचेल, मोदींकडून शुभेच्छा!

मुंबई : राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त सुरु होणाऱ्या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आज पहाटेपासूनच अनेक कार्यक्रमही घेतले जात आहेत. पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा, गाण्यांच्या मैफीली, बाईक रॅली आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जात आहेत. मुंबईतील सायन परिसरातील साधना विद्यालयात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात पार पडला. या ठिकाणी प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी काढलेल्या शोभायात्रेत मराठी माध्यमांच्या …

गुढीपाडव्याचा उत्साह, शोभायात्रांची रेलचेल, मोदींकडून शुभेच्छा!

मुंबई : राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त सुरु होणाऱ्या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आज पहाटेपासूनच अनेक कार्यक्रमही घेतले जात आहेत. पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा, गाण्यांच्या मैफीली, बाईक रॅली आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जात आहेत.

मुंबईतील सायन परिसरातील साधना विद्यालयात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात पार पडला. या ठिकाणी प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी काढलेल्या शोभायात्रेत मराठी माध्यमांच्या या मुलांनी धम्माल करत या मराठीमोळ्या सणाचे महत्व जपण्याचा प्रयत्न केला. दादर, गिरगाव, ठाणे अशा विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. या शोभा यात्रांमधून परंपरा आणि आधुनिकतेचे सुरेख मिश्रण पाहायला मिळत आहे.

कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे मराठी नववर्षारंभानिमित्त पहाटगाणी व मराठी नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आज पहाटे ५ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. येथे गुढी पाडव्यानिमित्त सादर होणाऱ्या ‘स्वरमैफिल’ कार्यक्रमाचे हे 15 वे वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी सारेगमपची लिटल चॅम्प कार्तिकी गायकवाड, गायक व संगीतकार पंडीत कल्याणजी गायकवाड, कलर्स मराठीवरील गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांच्यासह अनेक कलाकारांनी आपला स्वराविष्कार सादर केला. पहाटेच्या गाण्याने मैफिल चांगलीच रंगली. पाडव्याच्या पहाटे मराठी गाण्यांनी सगळ्यांचीच मने जिंकली.

पंतप्रधान मोदींकडून मराठीत शुभेच्छा

दरम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करुन महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ पाहा:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *