Gunratna Sadavarte : माझ्याविरोधात मेसेज फिरवल्याने तक्रारी; माझी आक्षेपार्ह वक्तव्ये म्हणजे माध्यमांना दिलेली उत्तरे, सदावर्तेंची कोर्टात बाजू

न्यायालयात फिर्यादीचे वकील शिवाजीराव राणे म्हणाले की, सदावर्ते यांनी वारंवार मराठा समाज आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. या मागे आणखी कोण आहेत. कोणाच्या साथीने ते अशी वक्तव्ये करतात, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी.

Gunratna Sadavarte : माझ्याविरोधात मेसेज फिरवल्याने तक्रारी; माझी आक्षेपार्ह वक्तव्ये म्हणजे माध्यमांना दिलेली उत्तरे, सदावर्तेंची कोर्टात बाजू
गुणरत्न सदावर्तेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 1:18 PM

कोल्हापूरः गुणरत्न सदावर्ते जेलमध्ये आहे. तक्रारी दाखल करा, असा मेसेज सगळ्यांना देण्यात आला. त्यानंतर आपल्यावर तक्रारी दाखल होत आहेत, असा युक्तिवाद एसटी आंदोलनाच्या उत्तरार्धाचे नेते वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोल्हापूर न्यायालयात केला. मराठा समजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाने काल गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे (Kolhapur Police) दिला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे सदावर्ते यांच्याविरोधात सातारा आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच सदावर्ते यांच्यावर मुंबई, पुणे, बीड, सोलापूर अशा अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून त्यांचा मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा असा प्रवास पाहायला मिळाला. शरद पवार यांच्या निवासस्थानवर झालेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते यांच्या मागे लागलेला कोठडीचा ससेमिरा काही केल्या संपायला तयार नाही. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून आज कोल्हापूर न्यायालयात (Court) युक्तीवाद झाला.

वारंवार आक्षेपार्ह विधाने…

न्यायालयात फिर्यादीचे वकील शिवाजीराव राणे म्हणाले की, सदावर्ते यांनी वारंवार मराठा समाज आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. या मागे आणखी कोण आहेत. कोणाच्या साथीने ते अशी वक्तव्ये करतात, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सदावर्ते यांच्याकडून पीटर बारदेस्कर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, सदावर्ते यांनी वक्तव्य केल्यानंतर जातीय तेढ निर्माण झाला नाही. ते जे काही बोलले ते माध्यमामध्ये आहे. त्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही, असा दावा त्यांनी केला.

म्हणून तक्रारीचा मुहूर्त…

न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनीही बाजू मांडली. सदावर्ते यांनी यावेळी फिर्यादीच्या चुका न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. शिवाय तक्रार इतक्या दिवसानंतर का केली, हा मुहूर्त कुठून शोधन काढला, असे प्रश्न उपस्थित केले. गुणरत्न सदावर्ते जेलमध्ये आहे. तक्रारी दाखल करा, असा मेसेज सगळ्यांना देणात आला. त्या नंतर तक्रारी दाखल होत आहेत, असा दावा त्यांनी केला.

आतापर्यंत दंगे का नाही झाले…

न्यायलयात सदावर्ते म्हणाले की, माझी आक्षेपार्ह वक्तव्ये म्हणजे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत. त्यांच्याकडे व्हिडीओ आहे. ते तपास करू शकतात. व्हाइस रेकॉर्डिंग एमसीआरमध्ये घेऊ शकतात. ते दंगे होतील असे कारण देत आहेत. मग ते आतापर्यंत का झाले नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आता यावर न्यायालय सदावर्तेंना जेल देणार की बेल, हे थोड्याच वेळात समजेल.

इतर बातम्या :

Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची ‘बॉबी डार्लिंग’, मनसे नेत्यांच्या टार्गेटवर मुंडे, अमेय खोपकर म्हणतात, हे तर ‘तात्या विंचू’

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, मात्र आता ताबा कोल्हापूर पोलिसांकडे! प्रकरण काय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.