हर्षवर्धन जाधव ‘हिमजीकल’, 1 कोटी रुपयांसाठी बायकोला मारहाण करुन माहेरी हाकललं : चंद्रकांत खैरे

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे (Harsharvadhan Jadhav beat wife for money).

हर्षवर्धन जाधव 'हिमजीकल', 1 कोटी रुपयांसाठी बायकोला मारहाण करुन माहेरी हाकललं : चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 6:01 PM

औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. चंद्रकांत खैरे, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे असो की उध्दव ठाकरे जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. आता त्यांनी सासरे आणि भाजपचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही घर फोडल्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे (Harsharvadhan Jadhav beat wife for money).

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. खैरे म्हणाले, “ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांचा बदला मी घेत नाही, तर परमेश्वर त्यांचा बदला घेतो. हर्षवर्धन जाधव यांचीही आता केवळ सुरुवात झाली आहे. त्यांनी माहेरुन 1 कोटी रुपये आणण्यासाठी बायकोला मारहाण केली. तसेच त्यांना गाडीतून उतरवून माहेरी हाकलून दिलं. यानंतर त्यांच्या पत्नी संजना जाधव माहेरी भोकरदनला निघून गेल्या. या सर्व कारणांमुळे संजना जाधव विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना मतदानही करायला आल्या नव्हत्या.”

रावसाहेब दानवे आणि त्यांच्या पत्नीने माझ्याविरोधात काम केलं होतं. त्यामुळेच आता हे सर्व घडतं आहे. यावरुन हर्षवर्धन जाधव हा किती ‘हिमजीकल’ आहे हे सगळ्यांना कळलं असेल, असंही खैर यांनी नमूद केलं.

हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर दानवे यांच्या घरातच राजकीय वादळ उठल्याचं पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय आलेख उतरत्या दिशेने असून त्यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरलं आहे. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत अनेकांवर गंभीर आरोप केले.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला 5 कोटींची ऑफर दिली, राज ठाकरे हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरे निष्क्रिय आहेत असे अनेक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केले. आता तर हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःचे सासरे रावसाहेब दानवेंवरच गंभीर आरोप केले. माझ्या बायकोला हाताशी धरुन रावसाहेब दानवे माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केलाय.

हर्षवर्धन जाधव यांच्या आरोपांवर रावसाहेब दानवे किंवा जाधव यांची पत्नी संजना जाधव यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हर्षवर्धन जाधव यांचे राजकीय हाडवैरी असलेले चंद्रकांत खैरे यांनी याच संधीचा फायदा घेत जाधव यांना लक्ष्य केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांनी 1 कोटी रूपयांसाठी स्वतःच्या बायकोचा छळ केल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

या घटनाक्रमाने रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्या घरात दरी पडल्याची चर्चा होत आहे. मात्र, यामागे हर्षवर्धन जाधव यांचं राजकारण असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. हर्षवर्धन जाधव हे वाटत नसले, तरी पट्टीचे राजकारणी आहेत. त्यांनी सध्या घेतलेली भूमिका ही जाणीवपूर्वक घेतल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

जाधव आणि दानवे यांच्यातील या वादानंतर सध्या औरंगाबाद आणि जालन्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर रावसाहेब दानवे आणि संजना जाधव काही प्रतिक्रिया देतील याची शक्यता कमी आहे. मात्र ज्या हर्षवर्धन जाधव यांना आजपर्यंत रावसाहेब दानवे ताकद देत आल्याचं बोललं गेलं. आता त्याच हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवर अवसान घातकी हल्ला केल्यानं परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.