जिना चढताना पायाचा आवाज, मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनींना अजब शिक्षा

विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यासाठी शिक्षक कधी-कधी अमानुष बनतात आणि यात नको तो अनर्थ घडतो (Headmaster given punishment to students).

Headmaster given punishment to students, जिना चढताना पायाचा आवाज, मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनींना अजब शिक्षा

चंद्रपूर : विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यासाठी शिक्षक कधी-कधी अमानुष बनतात आणि यात नको तो अनर्थ घडतो. असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर इथं घडला आहे. मुख्याध्यापिकेने दिलेल्या शिक्षेमुळे शासकीय शाळेतील विद्यार्थींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. अनुसुचित जाती आणि नवबौद्ध मूलींच्या शासकीय शाळेत हा प्रकार घडला (Headmaster given punishment to students).

जिना चढताना पायांचा जोरात आवाज आल्याने शाळेच्या मुख्याध्यापक दुशीला मेश्राम यांनी तब्बल 38 विद्यार्थीनींना सुमारे 150 उठाबशा काढायला लावल्या. यावेळी मुली रडत होत्या. मात्र, मुख्यध्यापकबाईंना पाझर फुटला नाही. विद्यार्थींनींच्या पायाला सूज आली असून नसा ताणल्या गेल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.

या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप पसरलाय. मुख्यध्यापिकांवर निलंबणाची कारवाई करण्याची मागणी पीडित मुलींच्या पालकांनी केली आहे(Headmaster given punishment to students).

या शाळेत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत 195 मुली शिक्षण घेत आहेत. 18 फेब्रुवारी रोजी शाळा सुरु होण्यापूर्वी प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर मेडीटेशन दरम्यान दहावीच्या वर्गातील मूली प्रात्यक्षिकच्या वह्या आणण्याकरिता दुसऱ्या मजल्यावर गेल्या. तेव्हा मुख्याध्यापिका दुशीला मेश्राम यांनी त्यांना बोलावलं आणि “पायांचा जोरात आवाज करता, तुम्हाला शिस्त नाही”, असं ठणकावत सर्व मुलींना उठाबशा काढायल्या लावल्या. मुली रडू लागल्या, पण तरीही त्यांची शिक्षा थांबली नाही. दुसऱ्या दिवशी मुलींना धड उभं राहता येत नव्हतं. शेवटी तीन दिवसांनी त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *