गुप्तधनासाठी चिमुकल्याचा निघृणपणे नरबळी, एक-एक पाय बाजूला करुन हत्या

गुप्तधनासाठी चिमुकल्याचा निघृणपणे नरबळी, एक-एक पाय बाजूला करुन हत्या

सोलापूर : पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आणखी एक संतापजनक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात 9 वर्षीय चिमुरड्याचा नरबळी दिल्याचं उघड झालंय. मंगळवेढ्यातील बहुचर्चित प्रतिक शिवशरण या 9 वर्षीय चिमुरड्याची हत्या नसून त्याचा नरबळी दिल्याचा प्रकार आता उघड झालाय.

आरोपी नानासाहेब डोके याच्यासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना शारीरिक व्याधीतून सुटका होण्यासाठीचा विधी आणि गुप्तधनासाठी प्रतिकचा नरबळी घेतल्याची माहिती समोर आलीय. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

27 ऑक्टोबर 2018 रोजी प्रतिक शिवशरण याचा आघोरी मांत्रिक भरत शिवशरण या आरोपीच्या सहाय्याने हा नरबळी घेतलाय. हा बळी इतक्या निघृणपणे घेतलाय की, विधीसाठी टप्प्याटप्याने प्रतिकचा एक पाय आणि डोक्यावरील केस पूर्णतः काढण्यात आल्याची माहिती समोर आली.

या गुन्ह्यात यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एक अल्पवयीन आरोपी अटकेत होता. त्यानंतर आता मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे समतेचा संदेश देणाऱ्या संतांची भूमी असणाऱ्या मंगळवेढ्यात नरबळीचा प्रकार म्हणजे संतांच्या शिकवणीचे अपयशच म्हणावे लागेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI