मुंबईकरांनो सावधान, राज्यात उष्णतेची लाट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात कमालीची वाढ होत असून मार्च अखेरीस राज्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यात तापमान वाढ कायम राहणार असून सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे …

मुंबईकरांनो सावधान, राज्यात उष्णतेची लाट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात कमालीची वाढ होत असून मार्च अखेरीस राज्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यात तापमान वाढ कायम राहणार असून सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागतर्फे करण्यात आले  आहे.

 

महाराष्ट्रासह मुंबईत सध्या थंडी ते उन्हाळा असा ऋतूबदल होत असून वाऱ्याची दिशाही बदलली आहे. सध्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात मार्च अखेरीस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अशाचप्रकारचे चढे तापमान मुंबईकरांना अनुभवण्यास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात येत आहे.

दरम्यान, रविवारी मुंबईत हवामान विभागाने 36.7 अंश सेल्सिअसची नोंद केली असून सोमवारी मुंबईतील  कमाल तापमान 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सातांक्रुझ 36.7, कुलाबा 33.5, बोरिवली 40, ठाणे 41, डोंबिवली 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांनाही उन्हाळ्याची चाहूल लागली असून मुंबईकर सर्वत्र शीतपेय, आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *