कोल्हापुरात 'बाहुबली'चा जन्म!

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर: महाराष्ट्रात एका वजनदार बाळाचा जन्म झाला आहे. कोल्हापुरातल्या पत्की हॉस्पिटलमध्ये तब्बल 5 किलो 181 ग्रॅमच्या बाळाचा जन्म झाला. क्वचितच इतक्या वजनाची बाळं जन्माला येतात. यामध्ये बाळ-आई आणि डॉक्टरांचीही कसोटी लागते. कोल्हापुरातल्या पत्की हॉस्पिटलमध्ये काल हे बाळ जन्माला आलं. जन्मानंतर बाळाचं वजन केलं तर ते चक्क 5 किलो 181 ग्रॅम …

, कोल्हापुरात ‘बाहुबली’चा जन्म!

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर: महाराष्ट्रात एका वजनदार बाळाचा जन्म झाला आहे. कोल्हापुरातल्या पत्की हॉस्पिटलमध्ये तब्बल 5 किलो 181 ग्रॅमच्या बाळाचा जन्म झाला. क्वचितच इतक्या वजनाची बाळं जन्माला येतात. यामध्ये बाळ-आई आणि डॉक्टरांचीही कसोटी लागते.

कोल्हापुरातल्या पत्की हॉस्पिटलमध्ये काल हे बाळ जन्माला आलं. जन्मानंतर बाळाचं वजन केलं तर ते चक्क 5 किलो 181 ग्रॅम वजन भरलं. कदाचित महाराष्ट्रातील हे सगळ्यात वजनदार बाळ असण्याची शक्यता आहे. बाळ अगदी सुखरुप आहे. मात्र बाळाचे वजन कमी किंवा जास्त असते, त्यावेळी त्याची काळजी घ्यावी लागते. प्रसुतीदरम्यान आईला मधुमेह होता. त्यामुळं या बाळाचं वजन वाढल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

, कोल्हापुरात ‘बाहुबली’चा जन्म!

जन्म झाल्यानंतर बाळाच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याआधी या मातेला दोन मुली आहेत. मात्र आता वजनदार मुलगा जन्माला घातल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

भारतामध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या मधुमेहाच्या आजारात वाढ होत आहे. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येत आहे. जंक फूडच्या सवयींमुळं मधुमेहाचे रुग्णा वाढत असल्याचं डॉक्टर सांगतात.

पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेलं हे बाळ वजनदार आहे.मात्र सध्या त्याला दक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.गेल्या वर्षी कोल्हापुरात 5 किलो वजनाचे बाळ जन्माला आले होते. आता पुन्हा एकदा त्याच कोल्हापुरात सगळ्यात वजनदार बाळाचा जन्म झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *