हेमंत करकरेंनी देशासाठी बलिदान दिलंय, साध्वी प्रज्ञासिंगने सांभाळून बोलावं : मा. गो. वैद्य

नागपूर : भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंगने शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झालय. प्रज्ञासिंग ठाकूरने सांभाळून वक्तव्य करावं, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी दिलाय. शिवाय हेमंत करकरे यांनी देशासाठी बलिदान दिलं याबाबत कुणीचीही शंका असण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले. ‘साध्वी प्रज्ञासिंगवरचे […]

हेमंत करकरेंनी देशासाठी बलिदान दिलंय, साध्वी प्रज्ञासिंगने सांभाळून बोलावं : मा. गो. वैद्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नागपूर : भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंगने शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झालय. प्रज्ञासिंग ठाकूरने सांभाळून वक्तव्य करावं, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी दिलाय. शिवाय हेमंत करकरे यांनी देशासाठी बलिदान दिलं याबाबत कुणीचीही शंका असण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.

‘साध्वी प्रज्ञासिंगवरचे आरोप न्यायालयाने फेटाळले आहेत. कोठडीत असताना हेमंत करकरे यांनी आपला छळ केला’ असा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा आरोप आहे. त्याबद्दल तिने आपलं मत व्यक्त.  तिचा छळ केला असेल तो छळ करायला नको होता’ असं मत मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केलं. हेमंत करकरे हुतात्मा झाले याबाबत कुणाचीही शंका नाही. हेमंत करकरे यांच्या परिवाराने साध्वी प्रज्ञासिंगवर दावा करावा, असंही ते म्हणाले.

मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञासिंगविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर तिने माफीही मागितली. शिवाय हे माझं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण दिलं.

हेमंत करकरे यांचा अल्पपरिचय

हेमंत करकरे दहशतवादविरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी होते. मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. याशिवाय हेमंत करकरे मालेगाव साखळी बॉम्ब स्फोटाचे तपास अधिकारी होते. याच खटल्यात साध्वी प्रज्ञा आरोपी होती.

हेमंत करकरे यांचा जन्म 12 डिसेंबर 1954 रोजी झाला होता. 1982 मध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस सहआयुक्त पद भूषवणारे करकरे हे नंतर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख बनले. मुंबईवरील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांना भारत सरकारने अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित केलं.

VIDEO : साध्वी प्रज्ञासिंगचं वक्तव्य

Non Stop LIVE Update
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.