महावितरणच्या अजब कारभाराचा गजब नमुना; 12 लाख घेऊन अवैध खांबही पुरवले अन् शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल

आडगाव मुटकुळे येथील शेतकऱ्यांनी 12 लाख रुपये वर्गणी जमा करुन शेतीसाठी 9 रोहित्र बसवून घेतले.

महावितरणच्या अजब कारभाराचा गजब नमुना; 12 लाख घेऊन अवैध खांबही पुरवले अन् शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 6:52 PM

हिंगोली : हिंगोलीत महावितरणाच्या अजब कारभाराचा उत्कृष्ट नमुना समोर आला आहे (Hingoli Farmers Hunger Strike). आडगाव मुटकुळे येथील शेतकऱ्यांनी 12 लाख रुपये वर्गणी जमा करुन शेतीसाठी 9 रोहित्र बसवून घेतले. त्यासाठी तेथील अभियंत्यांनी विद्युत खांब दिले, रोहित्र दिले आणि अवैधरित्या खांब आणि पोल आणल्याचं सांगून शेतकऱ्यांवरच गुन्हाही दाखल केला. त्याविरोधात शेतकऱ्यांनी सोमवारपासून (2 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरु केलं. मात्र, भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशात मांडण्याचं आश्वासन दिलं आणि शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतलं (Hingoli Farmers Hunger Strike).

नेमकं काय घडलं?

हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथे रोहित्रांवर ताण पडून विजेचा सतत खंड पडत असल्याने शेतकऱ्याची पिकं वाळत होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी महावितरणकडे नवीन रोहित्रांचे कोटेशन मागितले. तेथील अभियंते सुरेशसिंग राठोड यांनी एका योजनेत तुम्हाला कोटेशन देतो, म्हणून पैसे भरण्याचे सांगितले.

या गावातील 51 शेतकऱ्यांनी मिळून त्या सर्कलचे अभियंते राठोड यांच्याकडे 12 लाख रुपयांची वर्गणी जमा करुन 9 रोहित्र आणि 90 विद्युत पोल उभारुन घेतले. वीजही आली शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरली. पण, वरिष्ठांना ही वीज जोडणी अधिकृत नसल्याची कुणकुण लागली आणि कुठलीही चौकशी न करता महावितरणने थेट शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले.

शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचं सांगत आडगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरु केलं. जर आम्ही वीज अवैध वापरली असेल, तर तर पोल आणि रोहित्र काय बाजारात मिळत नाहीत, ज्यांनी आमच्याकडून कोटेशनच्या नावाखाली पैसे उकळून शेतकऱ्यांची फसवणूक केली, ज्यांनी वीज जोडणी दिली. त्यांच्याच तक्रारीवरुन पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले (Hingoli Farmers Hunger Strike).

या प्रकरणी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी मध्यस्थी करुन येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवून तोडगा काढतो, असं म्हणत शेतऱ्यांचे आंदोलन मागे घेतले.

अधिकाऱ्यांनी स्वतःची कातडी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. हे चुकीचे गुन्हे मागे घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

Hingoli Farmers Hunger Strike

संबंधित बातम्या :

एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा

पांढऱ्या सोन्याला लाल बोंड अळीचं ग्रहण, शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात

कापूस, सोयाबीनसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ५ नोव्हेंबरनंतर ‘कपडे फाडो’ आंदोलनाचा इशारा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.