हिंगोली जिल्हा परिषेदेत मनुष्यबळाचा अभाव, तब्बल इतकी पदे रिक्त, योजनांची अंमलबजावणी करण्यास विलंब!

हिंगोली जिल्हा परिषदेचे हे गाराने आजपासूनचे नाही तर गेल्या अनेक वर्षांमध्ये इथे अनेक पदे रिकामीच आहेत. रिक्त पद भरण्यासंदर्भात अनेक वेळा बैठका झाल्या पण अद्यापही यावर कोणताही तोडगा काढण्यात आली नाहीये. जिल्हा परिषेदेचे मुख्याधिकारी वैद्यकीय कारणाने रजेवर होते, तर त्यांचा चार्ज काही दिवसांपूर्वी प्रभारी उप कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच होता.

हिंगोली जिल्हा परिषेदेत मनुष्यबळाचा अभाव, तब्बल इतकी पदे रिक्त, योजनांची अंमलबजावणी करण्यास विलंब!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:40 AM

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषेदेमध्ये (Hingoli Zilla Parishad) गेल्या कित्येक वर्षांपासून मनुष्यबळाचा अभाव आहे. जिल्हा परिषेदेमध्ये अनेक पद रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होतो आहे. सातत्याने नवनवीन योजनांची अंमलबजावणी, सर्वेक्षणाची कामे करण्यासाठीही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. हिंगोली जिल्हा परिषदेत अंदाजे 60 टक्क्यांवर पदे रिक्त (Vacancies) असल्याची माहिती मिळते आहे. जिल्हा परिषेदेतील वर्षांनुवर्षे रिक्त पदांमुळे कामाचा बोजा हा वाढतच आहे. इतकेच नाही तर रिक्त पदांमुळे कामाचा अतिरिक्त ताण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येतो आहे. जवळपास 19 क्लास वन अधिकाऱ्यांचे (Officers) पदे जिल्हा परिषेदेसाठी मंजूर आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे फक्त यापैकी साधारण 7-8 क्लास वन अधिकाऱ्यांचे भरलेली आहेत.

अनेक वर्षांपासून पदे रिक्तच

हिंगोली जिल्हा परिषदेचे हे गाराने आजपासूनचे नाही तर गेल्या अनेक वर्षांमध्ये इथे पदे रिकामीच आहेत. रिक्त पद भरण्यासंदर्भात अनेक वेळा बैठका झाल्या पण अद्यापही यावर कोणताही तोडगा काढण्यात आली नाहीये. जिल्हा परिषेदेचे मुख्याधिकारी वैद्यकीय कारणाने रजेवर होते, तर त्यांचा चार्ज काही दिवसांपूर्वी प्रभारीच सांभाळत होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी (अर्थविभाग) रिक्त, उप शिक्षण अधिकारी दोन पैकी एक रिक्त, बांधकाम उप अभियंता (वसमत) रिक्त,उप कार्यकारी अभियंता रिक्त, गट विकास अधिकारी (रोजगार हमी योजना )रिक्त, बांधकाम कार्यकारी अभियंता रिक्त, प्रकल्प संचालक, कार्यकारी अभियंता (लघु सिंचन) रिक्त, बीडीओ. गट शिक्षण अधिकारी पाच रिक्त, बाल विकास प्रकल्प अधिकारी हेही पद रिक्तच आहे.

हे सुद्धा वाचा

हिंगोली जिल्हा परिषदेकडे दुर्लक्ष

मागील काही वर्षांपासून अनेक जिल्हा परिषदेत नव्याने अनेक अधिकारी देण्यात आले. मात्र, कायमच हिंगोली जिल्हा परिषदेकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्हा परिषेदेत वर्ग एक ते चार दर्जाची पदे रिक्त असल्याने कामकाज करताना प्रशासनाची ओढाताण सुरू आहे. कामाचा ताण वाढल्याने अधिकारीही मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे बोलले जात आहे. कामाचा ताण वाढल्याने काही वरिष्ठ अधिकारी चक्क शनिवार, रविवारी आऊट ऑफ कव्हरेज राहतात. मोबाईल बंद ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. सुट्टीच्या दिवशीही कामे करण्यासाठी वेळ द्यावा लागतो.

खालील प्रमाणे पदे रिक्त:-

  1. उप कार्यकारी अधिकारी(सामान्य) रिक्त
  2. मुख्य लेखा व वित्त अधिकारी (अर्थविभाग)रिक्त
  3. उप शिक्षण अधिकारी दोन पैकी एक रिक्त
  4. बांधकाम उप अभियंता (वसमत)रिक्त
  5. उप कार्यकारी अभियंता रिक्त
  6. गट विकास अधिकारी (रोजगार हमी योजना )रिक्त
  7. बांधकाम कार्यकारी अभियंता रिक्त
  8. प्रकल्प संचालक रिक्त
  9. कार्यकारी अभियंता (लघु सिंचन) रिक्त
  10. बी .डी. ओ. गट शिक्षण अधिकारी पाच ही रिक्त
  11. बाल विकास प्रकल्प अधिकारी 06 पैकी 04 रिक्त
Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.