सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव द्या, गृह राज्यमंत्र्यांची मागणी

सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीला संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सचिव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही उपस्थिती लावली होती (Balasaheb Thackeray name to Sahyadri Tiger Reserve)

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव द्या, गृह राज्यमंत्र्यांची मागणी
Follow us
| Updated on: Jun 07, 2020 | 5:09 PM

कराड : सातारा आणि सांगली जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी गृह राज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी केली. (Home Minister for State Shambhuraj Desai demands Balasaheb Thackeray name to be given to Sahyadri Tiger Reserve)

सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी शंभूराज देसाई यांनी प्रकल्प आणि पर्यटन विकासाच्या संदर्भात काही मुद्दे मांडले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी शंभूराज देसाई यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करुन लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल, आणि नामविस्तारावर शिक्कामोर्तब होईल असा, विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : ‘आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल’, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

तालुक्यातील काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरल्याची माहिती देसाई यांनी दिली. घाटमाथ्यावर कोकण दर्शन विकसित करणे, वॉकिंग ट्रॅक यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीला संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सचिव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही उपस्थिती लावली होती.

(Home Minister for State Shambhuraj Desai demands Balasaheb Thackeray name to be given to Sahyadri Tiger Reserve)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.