AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : आधी म्हणाले हेक्टरी 50 हजार द्या, आता पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं तर राऊत म्हणतात की…

Sanjay Raut : "शिवसेना पक्ष आणि चिन्हा सुनावणी बाबतचा खटला 16 व्या क्रमांकावर आहे. आज अमित शाह कुठे आहेत हे पहावं लागेल. कारण हा खटला शिवसेना विरुद्ध अमित शाह असा आहे. ते कुठली यंत्रणा वापरणार यावर आमचं लक्ष आहे. ज्या न्याय देवतेवर विश्वास ठेवला, तो विश्वास ढळेल अशी कृती न्यायादेवता करणार नाही" अशी अपेक्षा आहे असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : आधी म्हणाले हेक्टरी 50 हजार द्या, आता पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं तर राऊत म्हणतात की...
Sanjay Raut
| Updated on: Oct 08, 2025 | 12:19 PM
Share

“दीबा पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने केलं. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, नंतर आमचं सरकार राहिलं नाही. पण या कार्याला उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारचा फार मोठा हातभार लागला याचा मला आनंद आहे” असं संजय राऊत म्हणाले. “आम्ही या विमानतळाच्या लोकापर्ण सोहळ्याच स्वागत करतो. आता एक मागणी आहे, मुंबईचं मूळ विमानतळ जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जातं. त्या विमानतळाची ओळख पुसली जाऊ नये, कारण ते छत्रपतींच्या नावाने आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “मुंबईच्या विमानतळ परिसरात शिवसेनेने भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या. तिथे भूमिपुत्रांचा आवाज राहिला. नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावाने गरबा खेळला जाऊ नये. तिथेही भूमिपुत्रांना सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्या ही आमची मागणी आहे. तसं झालं नाही, तर संघर्ष होईल” असं संजय राऊत म्हणाले.

“पीएमचा भार हलका करण्यासाठी पंतप्रधान येण्याआधी फडणवीस यांनी पॅकेज घोषित केलं. पंतप्रधानांना यापेक्षा मोठं पॅकेज घोषित करण्यात काही अडचण नव्हती. फडणवीसांनी 31 हजार कोटींच पॅकेज घोषित केलं, मला त्यांना इतकाच प्रश्न विचारायचा आहे की, सरकारवर 9 लाख कोटींच कर्ज आहे, मग 31 हजार कोटींची उभारणी कशी करणार?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “पंतप्रधानांनी घोषणा केली असती, तर ते सर्व पैसे केंद्राकडून आले असते. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही, कवडी नाही आणि तुम्ही 31 हजार कोटींची घोषणा केली अशी टीका संजय राऊत यांनी केली. कर्जमाफीवर काही बोलला नाहीत. बाकी घोषणा आहेत. त्याची अंमलबजावणी कशी होणार? याची साशंकता आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘अजित पवार यांना झोप लागत नाही’

“पंतप्रधानांपुढे आंदोलन होऊ नये यासाठी काल पॅकेज जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस यांचं पॅकेज धुळफेक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आल्यानंतर त्यांना कोणी काळे झेंडे दाखवू नयेत, त्यांचा ताफा कोणी अडवू नये यासाठी केलेली ही धुळफेक आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राचे आहात, भाजपचे नाहीत. आमचेच शब्द का वापरता? जरा नवीन शब्दकोश वापरा. त्यात अनेक शब्द सापडतील. तिजोरी रिकामी असल्याने अजित पवार यांना झोप लागत नाही” असं संजय राऊत म्हणाले.

सामंतांच्या भेटीमुळे बडतर्फी? बडतर्फीनंतर चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया
सामंतांच्या भेटीमुळे बडतर्फी? बडतर्फीनंतर चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया.
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा.
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?.
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज.
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी.
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?.
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान.
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्...
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्....
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?.