राज्यात एका वर्षात किती वेळा आग, किती जंगल खाक?

नागपूर : मुंबईतील गोरेगाव येथील आरेच्या जंगलात सोमवारी भीषण आग लागली. या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर वन्य जीवांचेही हाल झाले आहेत. जवळपास 4 किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या या आगीला नियंत्रणात आणण्यासठी 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अशा प्रकारे राज्यातील जंगलात गेल्या वर्षभरात 4675 आगीच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात तब्बल 33067 …

नागपूर : मुंबईतील गोरेगाव येथील आरेच्या जंगलात सोमवारी भीषण आग लागली. या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर वन्य जीवांचेही हाल झाले आहेत. जवळपास 4 किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या या आगीला नियंत्रणात आणण्यासठी 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.
अशा प्रकारे राज्यातील जंगलात गेल्या वर्षभरात 4675 आगीच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात तब्बल 33067 हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे. जंगलांमध्ये आगीच्या घटनांची वन विभागाची ही आकडेवारी धक्कादायक आहे.
२०१६-१७ मध्ये राज्यातील जंगलात किती आगीच्या घटना घडल्या?
 

 
म्हणजे गेल्या एका वर्षात लागलेल्या आगीमुळे राज्यातील तब्बल 33067 हेक्टर जंगल जळून खाक झाल आहे. जंगलांमध्ये आग लागण्याच्या कारणांमध्ये जाणीवपूर्वक लालवेल्या वणव्याचंही प्रमाण जास्त आहे. एकिकडे पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून आपण कोट्यावधी रुपये झाडं लावण्यावर खर्च करतो, तर दुसरीकडे दरवर्षी लागणाऱ्या वणव्यात हजारो हेक्टर जंगल जळून खाक होतं. यामुळे मोठ्याप्रमाणात जैवविविधता धोक्यात आली आहे. म्हणूनच जंगलातील वाढत्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचं मोठा आव्हान आता वन विभागापुढे आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *