“बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मी पैसे सोडून सर्व खातो,” देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला तो किस्सा

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 9:07 PM

ते स्वतः हक्कभंग समितीसमोर बाळासाहेब गेले. तिथं विनोदबुद्धी चालू राहायची. बाळासाहेबांचा आदर होता. कोणीतरी गोड ठेवलं. तेव्हा त्यांना विचारलं गोड खाता का, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी पैसे सोडून सगळं खातो.

बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मी पैसे सोडून सर्व खातो, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला तो किस्सा
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9

मुंबई : बाळासाहेब ठाकरे अतिशय शांत असे होते. आवश्यक असे तेव्हा तुफानापेक्षा ज्यास्त संघर्ष करणारे असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे महासागर होते. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांदीआळीतले वेगळे असे नेते होते. बाळासाहेबांचे तैनचित्र सभागृहात लागले. पण, सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीचं झाला नाही. त्यांनी विचार केला असता तर ते मुख्यमंत्री होऊ शकले असते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक किस्सा सांगितला. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. राज ठाकरे यांनी सामनात एक कार्टून काढला. ते कार्टून त्यावेळच्या विधानसभेच्या अध्यक्षांचं होतं. त्यावेळी आर. आर. पाटील यांनी एक हक्कभंग आणला. समितीनं निर्णय घेतला की, प्रबंध संपादक यांना बोलावलं पाहिजे. त्यानिमित्त समितीसमोर बाळासाहेब यांनी उपस्थित राहण्याचा आदेश काढला. पत्रकार, व्यंगचित्रकार होते. बाळासाहेब हे तत्वानी चालणारे होते.

सभागृहाने शिक्षा मागे घेतली

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुढाकार करावा की, लोकशाहीने मूल्य दिले. त्या सभागृहाच्या समितीसमोर जावं, असा प्रश्न पडला. त्यावेळी ते स्वतः हक्कभंग समितीसमोर बाळासाहेब गेले. तिथं विनोदबुद्धी चालू राहायची. बाळासाहेबांचा आदर होता. कोणीतरी गोड ठेवलं.
तेव्हा त्यांना विचारलं गोड खाता का, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी पैसे सोडून सगळं खातो. समितीनं बाळासाहेब यांना शिक्षा सुनावली होती. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सभागृहानं ती शिक्षा मागे घेतली, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

चैतन्य निर्माण करत

बाळासाहेबांकडे प्रचंड ऊर्जा होती. त्याचा अनुभव आम्ही घेतला. १९९९ साली सरकार गेलं होतं. आमदारांची बैठक होती. आमदारांच्या बैठकीला बाळासाहेब ठाकरे आले. निराशा होती. पण, १०-१२ मिनिटं भाषण केलं. त्यातून चैतन्य निर्माण झालं. आपल्याशिवाय महाराष्ट्र निर्माण चालवू शकत नाही, अशी ऊर्जा निर्माण केली.

व्यक्तीला त्यांना ओळखता येत होते. दिलदारपणा असतो तेव्हा व्यक्ती मोठा होतो. मोठे होण्यासाठी मनाचा दिलदारपणा लागतो. समाजातल्या सर्व स्तरामध्ये बाळासाहेबांबद्दल आपुलकी आहे. कारण त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना संधी दिली, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.

जे बोलले ते दगडावरची रेख

आय अॅम अ मॅड मॅन ऑफ हिंदू, असं एका मुलाखतीमध्ये बोलत होते. राजकारणात असे फार कमी लोकं असतात. एकदा बोललेलं वाक्य परत घेण्यावर येत नाही. ते जे बोलले ती काळ्या दगडावरची रेख असे. जे बोलले ते कधी त्यांनी मागं घेतलं नाही. राजकीय बेरजेकरिता त्यांनी कधी राजकारण केले नाही. त्यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली. अनेक तरुण त्यांच्या पाठीशी होते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI