पत्नीच्या प्रियकराची हातोड्याने वार करत हत्या

पालघर : पत्नीसोबत तिच्या प्रियकराला बघून संतप्त झालेल्या पतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली. आरोपी पतीने पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यावर हातोड्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केली. विजय विष्णू लाडे असे आरोपी पतीचे नाव आहे. विशाल विलास भोईर (वय27) असे प्रियकराचे नाव होते. विजय हा पालघरच्या डुंगी पाडा येथे आपल्या पत्नीसोबत राहत होता. गवंडी …

पत्नीच्या प्रियकराची हातोड्याने वार करत हत्या

पालघर : पत्नीसोबत तिच्या प्रियकराला बघून संतप्त झालेल्या पतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली. आरोपी पतीने पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यावर हातोड्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केली. विजय विष्णू लाडे असे आरोपी पतीचे नाव आहे. विशाल विलास भोईर (वय27) असे प्रियकराचे नाव होते.

विजय हा पालघरच्या डुंगी पाडा येथे आपल्या पत्नीसोबत राहत होता. गवंडी काम करणारा विजय याला दोन मुले देखील आहेत. विशाल भोईर सोबत विजयच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. ती विशालसोबत अनेक वेळा घर सोडून गेली, मात्र आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत विजय नेहमी आपल्या पत्नीची समजूत काढून तिला नांदवत होता. रविवारी दुपारी विजय कामावरुन घरी आला, तेव्हा त्याला त्याच्या घरात विशाल दिसला. आपल्याच घरात पत्नीसोबत तिच्या प्रियकराला बघून विजय संतापला. त्याचा राग अनावर झाला आणि त्याने घरातील हातोड्याने विशालच्या डोक्यात जोरदार वार करण्यास सुरुवात केली. हातोडीने वार केल्याने विशाल रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता.

त्यानंतर आरोपी विजयने घराचा दरवाजा बाहेरुन बंद करत पळ ठोकला.

पत्नीने आरडाओरड  केल्यानंतर शेजारच्यांची घराचा दरवाजा उघडला आणि विशालला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पालघर रेल्वेस्टेशनवरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी पतीस अटक केली. आरोपी पती विजय लाडे विरोधात 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *