पतीचे अनैतिक संबंध, पत्नीने आईच्या मदतीने महिलेचा खून पाडला!

नागपूर : महिलेने महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरातील कळमना परिसरात घडली. पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला, तिचा पती आणि तिच्या आईला अटक केली आहे. नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एका महिलेने आईच्या मदतीने, नवऱ्याच्या प्रेयसीचा काटा काढला. आरोपी पत्नीच्या पतीचे मृत्यू झालेल्या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या …

पतीचे अनैतिक संबंध, पत्नीने आईच्या मदतीने महिलेचा खून पाडला!

नागपूर : महिलेने महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरातील कळमना परिसरात घडली. पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला, तिचा पती आणि तिच्या आईला अटक केली आहे.

नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एका महिलेने आईच्या मदतीने, नवऱ्याच्या प्रेयसीचा काटा काढला. आरोपी पत्नीच्या पतीचे मृत्यू झालेल्या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या या नात्याची कुणकुण पत्नीला लागली होती. त्यानंतर पती – पत्नीची वादावादी झाली.

नवऱ्याचा बाहेरील नाद सोडवण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले. मात्र यश येत नसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रयत्न करुन सुद्धा नवरा त्याच्या प्रेयसीला भेटणे थांबवत नसल्याने, पत्नीने तिच्या आईच्या मदतीने नवऱ्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले.

त्यावेळी तिने पुन्हा प्रेयसीला आपल्या नवऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र प्रेयसीने तिचा सल्ला धुडकावून लावल्याने, दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी आरोपी पत्नीच्या आईने प्रेयसीला मागून पकडले. त्यानंतर आरोपी पत्नीने पीडितेच्या पोटात शस्त्राने वार केले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच कळमना पोलिसांनी घटनास्थळ गाठून, आरोपी पत्नी आणि तिच्या आईला अटक केली. याशिवाय पतीलाही बेड्या ठोकल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *