पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पतीने पत्नीचा छळ केला, त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली. आत्महत्या केलेल्या पतीचं नाव जय तेलवानी तर अटकेतील पत्नीचं नाव तृप्ती तेलवानी असं आहे. 13 नोव्हेंबरला जय ने आत्महत्या केली होती. …

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पतीने पत्नीचा छळ केला, त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली. आत्महत्या केलेल्या पतीचं नाव जय तेलवानी तर अटकेतील पत्नीचं नाव तृप्ती तेलवानी असं आहे. 13 नोव्हेंबरला जय ने आत्महत्या केली होती. जयच्या कुटुंबीयांनी तृप्तीच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत तृप्तीला अटक केली.
तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती. यासाठी तिने जयला कर्ज काढायला भाग पाडलं. पैशांची पूर्तता न केल्यास ती शिवीगाळ करून मारहाण करत असे, तसेच स्वतःचं बरं-वाईट करून घेण्याची धमकीही देत असे, अशी तक्रार जयच्या घरच्यांनी केली.
व्हिडीओ अॅप्लिकेशनमध्ये कोणत्याही चित्रपटाआधी कॅन्सरचा दिला जाणारा संदेश तिने जयला म्हणायला लावला आणि तो स्वतःच त्याला कॅन्सर झाल्याचं सांगतोय असं या व्हिडीओत भासवले. तो व्हिडीओ ती जयच्या मित्रांना दाखवत असे. प्रेम विवाहानंतर वर्षभर सुखाचा संसार झाला, मात्र मार्च 2018 पासून तृप्तीने पैशासाठी जयचा अशाप्रकारे छळ केल्याचा आरोप जयच्या आईने केले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी तृप्तीला अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *