मी सगळ्याच पक्षांचा निष्ठावान कार्यकर्ता : इंदुरीकर महाराज

मी सगळ्याच पक्षांचा निष्ठावान कार्यकर्ता : इंदुरीकर महाराज

शिर्डी : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा 48 वा अभिष्टचिंतन सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमात मोठा हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.

मी गेल्या 20 वर्षांपासून परळी फेस्टिव्हलला असतो. मी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी परळीला, तर गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारामतीला असतो. मी सगळ्या पक्षांचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचं इंदुरीकरांनी म्हणताच मोठा हशा पिकला.

बाळासाहेब थोरात यांनी दूध अनुदानाचा विषय उपस्थित केल्यानंतर दुग्ध विकास मंत्री महादेव जावकरांनी येत्या आठ दिवसात थकीत दुधाचं पेमेंट देणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्याला दुधाला अनुदान देणारा देशातला मी पहिला मंत्री असल्याचा दावा करत, दोन अनुदान देण्यास अपमुळ विलंब झाला, थकीत अनुदान आठ दिवसात अदा होईल. तीन दिवसात 90 कोटी अनुदान देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं जानकर म्हणाले.

आजकाल आपल्याकडे महोत्सव आणि फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणत होतात. देवाच्या नावाखाली काय-काय होतं हे सगळ्यांना माहित आहे. आठ दिवस जे काही होतं ते शुद्धीकरण करण्यासाठी निवृत्ती महाराजांना बोलावलं जातं. तुम्हाला पहिल्या दिवशी बोलावलं तर पुढचे कार्यक्रम घेता येत नाही, अशा मिश्कील भाषेत पंकजा मुंडे यांनीपरळी फेस्टिव्हलवरून त्यांचे बंधू आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

या कार्यक्रमात इंदुरीकर चालवत असलेल्या विना अनुदानित शाळेस जानकर यांनी आमदार निधीतून 10 लाख देण्याची घोषणा केली. या निधीवर मी भागवणार नाही, असं पंकजा यांनी सांगितलं. “माझं आणि जानकर साहेबांचं भाऊ बहिणीचं नातं आहे. भावा-बहिणीची प्रॉपर्टी वेगळी नसते. पण मला भावांचे खूप चांगले अनुभव आले म्हणून आपलं वेगळं केलेलं बरं,” असंही पंकजा म्हणाल्या.

“उद्या पुण्यातील खात्याचा हिशोब झाला तर भाऊ म्हणेल हे माझं आहे. त्यामुळे माझी पंचाईत होईल. म्हणून आपलं पुण्य आपण कमावलं पाहिजे असा महाभारतातील दाखला देत पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केली. ग्रामविकास खात्याकडून शाळेच्या विकासासाठी 21 लाख रुपये ग्रामपंचायतीला देण्याची घोषणाही पंकजा यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI