डॉक्टर होता आलं नाही, पण डॉक्टरांचा मंत्री झालो : गिरीश महाजन

जळगाव : वडिलांची इच्छा होती, की मी डॉक्टर व्हावं, वडिलांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर होता आलं नाही. पण डॉक्टरांचा मंत्री झालो, अशी आठवण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितली. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नुतनीकरण करण्यात आलेल्या डायलिसिस युनिटचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथमच बॅच सुरू झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …

डॉक्टर होता आलं नाही, पण डॉक्टरांचा मंत्री झालो : गिरीश महाजन

जळगाव : वडिलांची इच्छा होती, की मी डॉक्टर व्हावं, वडिलांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर होता आलं नाही. पण डॉक्टरांचा मंत्री झालो, अशी आठवण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितली. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नुतनीकरण करण्यात आलेल्या डायलिसिस युनिटचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथमच बॅच सुरू झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गिरीश महाजन यांनी आपल्या शिक्षणाविषयी आणि साधारण व्यक्ती ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हा प्रवास उलगडला.

माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर झालो पाहिजे. पण मी अभ्यासात एवढा हुशार नव्हतो आणि मला खेळायची खूप आवड होती. मी पहिलवान आणि खेळाडू होतो, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

आज हुशार विद्यार्थी कॉलेजमध्ये सीआर (वर्ग प्रतिनिधी) होतो. पण मी पहिलवान असल्याने कॉलेजमध्ये हुशार नसताना सीआर झालो. नंतर यूआर झालो. वडिलांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर झालो नाही, पण डॉक्टरांचा मंत्री झालो, असा किस्सा गिरीश महाजनांनी सांगितला.

वडिलांनी बळजबरीने मला सायन्सला टाकलं. दहावीला मी कसा पास हे मलाच माहित.. बजरंग बलीला नारळ फोडून फुल चढवून मी दहावीला 37 टक्के मिळवले आणि दहावी पास झालो, असा किस्सा गिरीश महाजनांनी सांगितला.

गिरीश महाजन.. राज्याच्या मंत्रीमंडळातलं महत्त्वाचं नाव आहे. आंदोलन असो की संप, गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली आणि त्याला यश आलं नाही असं कधी होत नाही. त्यामुळेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मंत्री आहेत. प्रत्येक आंदोलन आणि सरकारच्या संकटाच्या वेळी ते धावून जातात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *