कुठेही शिवसेनेच्या बाजूने वातावरण नव्हतं, मुलाचा पराभव मान्य नाही : राणे

सिंधुदुर्ग : लोकसभेच्या निकालात आपल्या उमेदवाराचा पराभव झाला. हा संपूर्ण निकाल पाहिल्यानंतर आपल्याला संशयाला जागा असल्याचा आरोप भाजप पुरस्कृत खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केलाय. प्रत्येक मशीनमध्ये 7 ते 8 हजारांचा फरक कसा असू शकतो? त्यामुळे या निकालामध्ये काहीतरी हेराफेरी झाल्याचा संशय आपल्याला असल्याचं नारायण यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. महाराष्ट्र …

कुठेही शिवसेनेच्या बाजूने वातावरण नव्हतं, मुलाचा पराभव मान्य नाही : राणे

सिंधुदुर्ग : लोकसभेच्या निकालात आपल्या उमेदवाराचा पराभव झाला. हा संपूर्ण निकाल पाहिल्यानंतर आपल्याला संशयाला जागा असल्याचा आरोप भाजप पुरस्कृत खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केलाय. प्रत्येक मशीनमध्ये 7 ते 8 हजारांचा फरक कसा असू शकतो? त्यामुळे या निकालामध्ये काहीतरी हेराफेरी झाल्याचा संशय आपल्याला असल्याचं नारायण यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे आणि शिवसेनेकडून विनायक राऊत अशी लढत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात होती. राऊत यांचा पराभव मान्य नसल्याचं राणे म्हणाले. हा जो निकाल आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही. आपण पराभूत झालो असलो तरी हा पराभव आपल्याला मान्य नाही. या निवडणुकीत आपला पक्ष कुठेच कमी पडला नाही. चांगल्या प्रकारचा प्रचार झाला. वातावरण आपल्याबाजूने होतं. या उलट शिवसेना कमकुवत होती. कुठेही शिवसेनेच्या बाजूने मतदारसंघात वातावरण नव्हतं. शिवसेनेचे मतदान केंद्राबाहेर बूथही दिसत नव्हते. असं असताना शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं हे संशयास्पद आहे, असं ते म्हणाले.

या सदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची का याचा विचार सुरू आहे. आत्तापर्यंत तक्रार केलेल्याचं काय झालं? त्याचा विचार करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं नारायण राणे यांनी पडवे येथील आपल्या SSPM लाईफ टाईम मेडीकल कॉलेज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

एनडीएचे दोन घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राणेंचा स्वाभिमान यांच्यात लढत असलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा निवडणुकीत बालेकिल्यात शिवसेनेची, तर नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या लोकसभेच्या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत 1 लाख 78 हजारांपेक्षा जास्त मतांनी विद्यमान खासदार विनायक राऊत निवडून आले. माजी खासदार निलेश राणे यांचा पुन्हा एकदा पराभव करत विनायक राऊत यांनी यात बाजी मारली. मात्र शिवसेनेच्या या विजयानंतर नारायण राणे यांनी मात्र या निकालाबाबत शंका उपस्थित करत हा निकाल म्हणजे हेराफेरी असल्याचं मत व्यक्त केलंय.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *