मृत्यूच्या एक दिवस अगोदर गोपीनाथ मुंडेंना भेटलेले अनिल गोटे म्हणतात…

मृत्यूच्या एक दिवस अगोदर गोपीनाथ मुंडेंना भेटलेले अनिल गोटे म्हणतात...


बीड : लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन कथित हॅकरने खळबळजनक दावे केले. यामध्ये सर्वात खळबळजनक दावा म्हणजे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा अपघाताने नव्हे, तर घाताने झाला होता, असाही दावा करण्यात आला. यामुळे काहींनी चौकशीची मागणी केली आहे, तर काहींकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप होतोय. भाजप आमदार अनिल गोटे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 3 जून 2014 ला झाला. अनिल गोटे हे गोपीनाथ मुंडे यांना 2 जून 2014 ला म्हणजे मृत्यूच्या एक दिवस अगोदरच भेटले होते. पण हॅकरने जे काही दावे केलेत, त्यात काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. कारण, आम्ही सगळे मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे होतो. त्यांच्या बोलण्यातून तसं काहीही जाणवलं नाही. ते अत्यंत खुश होते, त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आहेत, असं अनिल गोटेंनी म्हटलंय.

दिल्लीहून महाराष्ट्रात येण्याच्या एक दिवस अगोदर मुंडे साहेब खुश होते. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी 5 जानेवारी ही तारीखही निश्चित केली होती. कारण, मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं होतं आणि यासाठी मुंडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ जाणार होतं, असं गोटेंनी सांगितलं.

काय आहे हॅकरचा दावा?

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.

अनिल गोटे काय म्हणाले?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI