क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर सरनाईक यांनी पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती ईडीला केली आहे. सध्या क्वॉरंटाईन असल्याने चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचं त्यांनी ईडीला कळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. (i quarantined, ShivSena MLA pratap sarnaik wrote ed)

क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 12:53 PM

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर सरनाईक यांनी पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती ईडीला केली आहे. सध्या क्वॉरंटाईन असल्याने चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचं त्यांनी ईडीला कळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. (i quarantined, ShivSena MLA pratap sarnaik wrote ed)

ईडीने काल मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. आज प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काल मंगळवारी ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

राऊत बंधूंनी क्वॉरंटाईन करून घ्यावं: सोमय्या

प्रताप सरनाईक हे क्वॉरंटाईन असतील तर ते काल दिवसभरात कुणा कुणाला भेटले त्यांची नावं जाहीर करावीत आणि शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत यांच्यासह सरनाईक ज्यांना ज्यांना भेटले त्यांनाही क्वॉरंटाईन करण्यात यावं. महापालिका आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन या लोकांना क्वॉरंटाईन करावं. त्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला. यावेळी त्यांनी शिवसेना कोविडला घाबरतेय की ईडीला असा चिमटाही काढला. (i quarantined, ShivSena MLA pratap sarnaik wrote ed)

संबंधित बातम्या:

LIVE | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाईन, पुढील आठवड्यात चौकशीला बोलवण्याची ED ला विनंती

ईडीचं उत्खनन हडप्पा-मोहेंजोदारोपर्यंत, ईडीच्या नोटीसची वाट पाहतोय, संजय राऊतांचा टोला

मी बोललो तर मला त्रास दिला, पवारसाहेबांना नोटीस दिली, विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी संस्थांचा वापर : छगन भुजबळ

(i quarantined, ShivSena MLA pratap sarnaik wrote ed)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.