मी लोकसभा निवडणूक लढणार नाही : विजय सिंह मोहिते पाटील

मुंबई : निवडणूक न लढवण्याची घोषणा केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. माढ्यातल्या उमेदवारीवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी सुरु आहे. या वादावर शरद पवारांच्या नावाने तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. शरद …

मी लोकसभा निवडणूक लढणार नाही : विजय सिंह मोहिते पाटील

मुंबई : निवडणूक न लढवण्याची घोषणा केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. माढ्यातल्या उमेदवारीवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी सुरु आहे. या वादावर शरद पवारांच्या नावाने तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.

शरद पवारांचा निर्णय जवळपास पक्का झाल्यानंतर माढ्याचे विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलंय. शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी मी केली होती आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दिलाय. मी नाराज असून निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिक्रिया विजय सिंह मोहिते पाटील यांनी दिली.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

दिल्लीत शरद पवारांच्या घरी बैठक | नायडू, ममता, केजरीवाल, अब्दुल्ला भेटणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *