‘हिंमत असेल तर भाजपने हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत’

प्रदेशाध्यक्षांनी विदर्भाला विसरु नये. विदर्भाने काँग्रेसला खूप काही दिले आहे. | MP Balu Dhanorkar

'हिंमत असेल तर भाजपने हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत'
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 12:12 AM

यवतमाळ: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) हिंमत असेल तर त्यांनी हेडगेवार आणि सावरकर यांच्या नावाने मत मागवून दाखवावीत, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केले. भाजपने शेतकऱ्याची थट्टा लावली आहे. भाजपने आश्वासन दिलेले रोजगार कुठे गेले, 15 लाख रुपये कुठे गेले, अशा प्रश्नांची सरबत्ती बाळू धानोरकर यांनी केली. (Congress MP Balu Dhanorkar criticize BJP and RSS)

ते शनिवारी यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार हे बडे नेते उपस्थित होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी चौफेर राजकीय फटकेबाजी केली. मी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासाठी मदत करायला तयार आहे. मदत चेकने हवी की कॅशमध्ये, ते सांगा. मात्र, प्रदेशाध्यक्षांनी विदर्भाला विसरु नये. विदर्भाने काँग्रेसला खूप काही दिले आहे. त्यामुळे विदर्भाला झुकते माप देत येथील दोन नेते विधान परिषदेत पाठवा. विदर्भाने काँग्रेसला 16 आमदार आणि माझ्या रुपाने एक नवसाचा खासदार दिला आहे, याची आठवण धानोरकर यांनी पक्षाच्या इतर नेत्यांना करुन दिली.

‘जनतेने मोदींना भरभरुन मते दिली, पण भाजपने लोकांमध्ये फूट पाडली’ देशातील लोक मोदी सरकारला भरभरुन मतं देतात. पण मोदी सरकार लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था आज काय झाली आहे? कोरोनापूर्वीच देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. मोदी सरकारने भांडवलदारांच्या सोयीसाठी संसदेत घाईघाईन कायदे मंजूर करवून घेतले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

‘आघाडीत लिमिटेशन आहेत, पण संघटनेत काम करताना लिमिटेशन नाही’ महाविकासआघाडी सरकारमध्ये काम करताना आपल्याला लिमिटेशन आहेत, पण पक्षसंघटनेमध्ये काम करताना नाही, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडीत सामील व्हावं की नाही, हा प्रश्न होता. पण सर्वांच एकमत झालं आणि काँग्रेस महाविकासआघाडीत सामील झाली. आपण कोणाची पिलावळ आहोत, ज्या महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची पिलावळ आहोत, इंदिरा गांधींची पिलावळ आहोत, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मी तसं बोललोच नाही, अशोक चव्हाणांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न

‘अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षेंना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवू नये’

(Congress MP Balu Dhanorkar criticize BJP and RSS)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.