नाशिक जिल्ह्यातील खेडेगावात गर्भपाताचं केंद्र, जमिनीत पुरलेले अर्भक सापडले

नाशिक : सरकारने गर्भपातावर बंदी घातल्यानंतरही काही ठिकाणी आजही अवैध गर्भपात केंद्र सुरू आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कौलाने या छोट्याशा गावात उघडकीस आलाय. अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे  पोलिसांनी छापा मारून जमिनीत पुरलेले अर्भकासह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी विवाहीत आणि अविवाहीत अशा दोन …

नाशिक जिल्ह्यातील खेडेगावात गर्भपाताचं केंद्र, जमिनीत पुरलेले अर्भक सापडले

नाशिक : सरकारने गर्भपातावर बंदी घातल्यानंतरही काही ठिकाणी आजही अवैध गर्भपात केंद्र सुरू आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कौलाने या छोट्याशा गावात उघडकीस आलाय. अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे  पोलिसांनी छापा मारून जमिनीत पुरलेले अर्भकासह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी विवाहीत आणि अविवाहीत अशा दोन जोडप्यांना ताब्यात घेतलंय.

मालेगाव – मनमाड रोडवर एका हॉटेलजवळ असलेल्या खोलीत नेहमीच अनोळखी महिला आणि पुरुष येत असल्याचं पाहून परिसरातील ग्रामस्थांना संशय आला आणि  त्यांनी पाळत ठेवली. सोमवारी सायंकाळी खोलीच्या बाहेर शेतात अनोळखी व्यक्ती काही तरी पुरत असल्याचं दिसताच ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि तहसीलदार ज्योती देवरे घटनास्थळी आले. त्यांनी जमीनीत पुरलेले अर्भक बाहेर काढून पंचनामा केला.

या प्रकरणी पोलिसांनी दोन जोडप्यांना ताब्यात घेतले असून हे जोडपे पुणे जवळील भोसरीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये ज्या महिलेचा गर्भपात करण्यात आला, तिचाही समावेश असल्याने गर्भपात कोणत्या डॉक्टराने केला याचा तपास पोलीस करत आहेत. गर्भपात केंद्र चालविणारे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याचाही तपास पोलीस करीत करत आहेत. फरार असलेल्या मुख्य आरोपी राहुल गोसावीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. तो शिरपूर येथे बीएचएमएसचं शिक्षण घेत असून कौलाने गावात दवाखानाही चालवत होता.

मालेगाव शहरात या अगोदरही गर्भपाताच्या घटना समोर आल्या होत्या. राज्याच्या इतर ठिकाणाहून लोक गर्भपात करण्यासाठी मालेगावात येत आहेत. याचा अर्थ की हे मोठं रॅकेट असून गावागावांत यांचे एजंट आहेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे कळी फुलण्याआधीच गर्भातच ती खोडून टाकणाऱ्या या नराधमांचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *