नागपुरात अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीला अटक

नागपुरात अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला मारहाणप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Illegal moneylender Arrested Nagpur)

नागपुरात अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 12:15 AM

नागपूर : अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला मारहाण आणि तिची साडी उतरवण्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये घडला. या प्रकरणी भिवापूर पोलीस ठाण्यात विनयभंग, फसवणूक आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (Illegal moneylender Arrested after Molests Farmer Lady in Nagpur)

भिवापूर पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन कलम 354, 354(4), 354 (ब), 420, 323, 504, 506 यांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत कलम 39, 41(क), 45 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपुरातील भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात पीडित महिलेच्या पतीची जमीन आहे. आरोपी अभय पाटीलकडून पीडित महिलेच्या पतीने दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते.

याच प्रकरणी 20 जूनला पीडित महिला ही शेतात काम करीत होती. त्यावेळी आरोपी अभय पाटील आणि त्याची पत्नी प्राजक्ता पाटील हे त्या ठिकाणी गेले.

सावकाराच्या पत्नीने थेट शेतात जाऊन शेतकरी महिलेला मारहाण केली. सावकार महिलेकडून सर्वांसमोर शेतकरी महिलेची साडीही ओढण्यात आली. शेवटी आपली अब्रू वाचवत शेतकरी महिला शेतातून निघून गेली. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

दुर्दैवाची बाब म्हणजे शेतकरी महिला बेअब्रू होत असताना निर्लज्ज सावकाराने या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

नागपूर जिल्ह्यात अवैध सावकारीला ऊत आला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं, शेतकऱ्याची शेतजमीन आपल्या नावावर लिहून घ्यायची, आणि मग वसुली झाली नाही, तर शेतकऱ्याच्या पोटाची भाकर असलेल्या शेतीवर कब्जा करायचा, प्रकार वारंवार समोर येतो. (Illegal moneylender Arrested after Molests Farmer Lady in Nagpur)

संबंधित बातम्या : 

नागपुरात सावकाराच्या पत्नीने शेतकरी महिलेची साडी खेचली, निर्लज्ज सावकाराकडून व्हिडीओ शूट

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.