नागपुरात सावकाराच्या पत्नीने शेतकरी महिलेची साडी खेचली, निर्लज्ज सावकाराकडून व्हिडीओ शूट

सावकाराच्या पत्नीने अखेर थेट शेतात जाऊन शेतकरी महिलेला मारहाण केली. सावकार महिलेकडून सर्वांसमोर शेतकरी महिलेची साडीही ओढण्यात आली (Illegal moneylender Molests Farmer Lady in Nagpur)

नागपुरात सावकाराच्या पत्नीने शेतकरी महिलेची साडी खेचली, निर्लज्ज सावकाराकडून व्हिडीओ शूट

नागपूर : अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला मारहाण आणि तिची साडी उतरवण्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये घडला. लज्जास्पद बाब म्हणजे शेतकरी महिलेची बेअब्रू होत असताना सावकार व्हिडीओ चित्रण करत होता. (Illegal moneylender Molests Farmer Lady in Nagpur)

नागपूर जिल्ह्यात अवैध सावकारीला ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे. भिवापूर तालुक्यात अवैध कर्जाच्या वसुलीसाठी सावकार शेतकरी दाम्पत्याकडे तगादा लावत असल्याचा आरोप आहे.

सावकाराच्या पत्नीने अखेर थेट शेतात जाऊन शेतकरी महिलेला मारहाण केली. सावकार महिलेकडून सर्वांसमोर शेतकरी महिलेची साडीही ओढण्यात आली. शेवटी आपली अब्रू वाचवत शेतकरी महिला शेतातून निघून गेली. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

दुर्दैवाची बाब म्हणजे शेतकरी महिला बेअब्रू होत असताना निर्लज्ज सावकाराने या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली आहे. सावकार दाम्पत्याला अटक करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

नागपूर जिल्ह्यात अवैध सावकारीला ऊत आला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं, शेतकऱ्याची शेतजमीन आपल्या नावावर लिहून घ्यायची, आणि मग वसुली झाली नाही, तर शेतकऱ्याच्या पोटाची भाकर असलेल्या शेतीवर कब्जा करायचा, प्रकार वारंवार समोर येतो.

(Illegal moneylender Molests Farmer Lady in Nagpur)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *