अहमदनगरमध्ये 60 वर्षीय भाजीवाल्या आजी निवडणुकीच्या मैदानात

अहमदनगर : महापालिका निवडणुकीचा प्रचार अहमदनगरमध्ये शिगेला पोहोचलाय. सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी वेगवेळ फंडे वापरताना दिसताय, तर अनेक स्टार प्रचारक देखील पालिका प्रचाराला येणार आहेत. मात्र या निवडणुकीत 60 वर्षांच्या पालेभाज्या विकणाऱ्या आजीबाई देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. त्या सध्या नगरसेविका असून भाजीपाला विकता विकत प्रचार करतात. या निवडणुकीत अहमदनगरमध्ये अनेक पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली …

अहमदनगर : महापालिका निवडणुकीचा प्रचार अहमदनगरमध्ये शिगेला पोहोचलाय. सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी वेगवेळ फंडे वापरताना दिसताय, तर अनेक स्टार प्रचारक देखील पालिका प्रचाराला येणार आहेत. मात्र या निवडणुकीत 60 वर्षांच्या पालेभाज्या विकणाऱ्या आजीबाई देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. त्या सध्या नगरसेविका असून भाजीपाला विकता विकत प्रचार करतात.
या निवडणुकीत अहमदनगरमध्ये अनेक पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. मात्र भाजी विकणाऱ्या 60 वर्षांच्या आजीबाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. नगरच्या सिडको भागात राहणाऱ्या कलावती शेळके सध्या नगरसेविका आहेत. त्या पुन्हा आपलं नशिब आजमावत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना समाजसेवेची आवड आहे. त्या भाजीपाला विकता विकता लोकांच्या समास्याबी सोडवतात.

रोज सकाळी 5 वाजता उठून त्या घरातील सर्व काम आवरून 7 वाजता भाजी विकायला बाहेर पडतात. मात्र आपल्या परिसरातील रस्ते, गटारी, मूलभूत सुविधा पाहून त्यांना राग येत असे. त्यांना शक्य होईल तेवढे आपल्या दोन मुलांच्या मदतीने त्यांनी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाहता पाहता त्यांचा जनसंपर्क दांडगा झाला आणि लोकांनी त्यांना नगरसेविका म्हणून निवडून दिलं.
शेळके आजींना दोन मुले आहेत. मोठा मुलगा लक्ष्मण शेळके गॅरेज आणि रिक्षा चालवतो. तर लहान मुलगा चंद्रकांत उर्फ काका शेळके आपल्या आईला कामांमध्ये मदत करतो. त्यांच्या पतीचं निधन 2008 मध्ये झालं. मात्र त्यांनी न डगमगता आपल्या मुलांच्या मदतीने खंबीरपणे लढा दिला. आपल्या भाजीपाल्याच्या व्यवसायावरच त्यांनी मुलांना लहानाचं मोठं केलं. त्यांच्या मुलांपेक्षाही आपल्या प्रभागात कलावती आजींची ओळख आहे. कलावती आजींनी कामातूनच भाजीपाला विकता-विकता लोकांना आपल्या वक्तृत्वातून प्रभावित केलं. हळूहळू त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवू लागल्या.

सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. तर कलावती आजी दरोरोज सकाळी 7 वाजता आपली भाजीपाल्याची हातगाडी घेऊन प्रचाराला सुरुवात करतात. तर भाजीपाला विकता-विकता त्या प्रचार करतात. प्रभागातील गल्लीबोळात जाऊन त्या महिलांना भाजीसोबत आपल्या केलेल्या कामांचा पाढा सांगत पॉम्प्लेट देखील देतात. प्रभागातील नागरिकही आपल्या समस्या सकाळी भाजी विकायला आलेल्या आजींना सांगतात. नंतर त्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या विशीतल्या तरुणाईला लाजवेल अशा चपळाईने आजी आपल्या कामात स्वतःला झोकून देतात. तर अडाणी असताना आपल्या अनुभवाच्या जोरावर त्या पालिकेत आपल्या प्रभागातील समस्या मांडतात. तर आमच्या आईमुळेच आम्हाला लोक ओळखतात अशी भावना त्यांच्या मुलाने व्यक्त केली.
कलावती आजी सध्या शिवसेनेच्या तिकिटावर आपलं नशीब अजमावत आहेत. या वयातही त्यांच्या समाजसेवीची चर्चा शहरात सुरू आहे. तर सकाळी घराबाहेर पडताना आपल्या मुलांसोबत त्या दिवसभरातील प्रचाराचे नियोजन करतात. सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक शहरात दाखल होत आहेत. मात्र कलावती आजी मात्र भाजी विकता-विकता आपला प्रचार करत आहेत. आता त्यांच्या या प्रचाराला जनता किती साथ देते हे येणाऱ्या 10 डिसेंबरलाच कळेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *