Nashik| नाशिक जिल्ह्यात 402 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक जिल्ह्यात सध्या 402 कोरोना रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. त्यात निफाडमधील 74, सिन्नर 55 रुग्णांचा समावेश आहे.

Nashik| नाशिक जिल्ह्यात 402 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
सांकेतिक फोटो

नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या 402 कोरोना रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. त्यात निफाडमधील 74, सिन्नर 55 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 503 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

उपचार घेत असलेले रुग्ण

उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 30, बागलाण 13, चांदवड 10, देवळा 06, दिंडोरी 10, इगतपुरी 04, कळवण 07, निफाड 74, सिन्नर 55, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 03, येवला 24 अशा एकूण 237 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 147, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 12 रुग्ण असून असे एकूण 402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 634 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.137 टक्के, नाशिक शहरात 98.21 टक्के, मालेगावमध्ये 97.13 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.79 इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 234 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 11, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संमेलनात कोरोना रुग्ण

नाशिकच्या साहित्य संमेलनात काल कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह येताच त्यांना घरी पाठवण्यात आले. दुसरीकडे संमेलनात सुरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा उडल्याचे दिसले. विशेषतः बहुतांश जण मास्क घालताना दिसत नव्हते. अनेकांना स्वयंसेवकांनी स्वतः मास्कचे वाटप केले. मात्र, लोकांनी मास्क घालण्याकडे दुर्लक्ष केलेले दिसले.

नियम पाळण्याचे आवाहन

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीचे दोन्ही डोस आवश्य घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!

Special News| डॉ. आंबेडकरांचा काळाराम मंदिर सत्याग्रह, येवल्यातली धर्मांतर घोषणा अन् अशी झाली रक्तहीन क्रांती!

Sharad Pawar| एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, पवारांकडून झिरवळांचे कौतुक; सत्ता येते-जाते, फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI