Nashik| 500 हून अधिक वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली; सामाजिक बदलाची नवी सुरुवात

नाशिक विभागात 500 हून अधिक जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

Nashik| 500 हून अधिक वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली; सामाजिक बदलाची नवी सुरुवात
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विविध कामांचा आढावा घेत चर्चा केली.
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 5:41 PM

नाशिकः नाशिक विभागात 500 हून अधिक जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे सामाजिक बदलांची सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून, पाचशेहून अधिक जातीवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. समाजकल्याण विभागाचे काम समाधानकारक सुरू आहे, असे गमे म्हणाले. त्यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

विविध समित्यांची स्थापना

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे पुढे म्हणाले की, राज्यातील, विभागातील, जिल्ह्यातील तसे ग्रामपंचायत, गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक गावांची नावे, वस्त्यांची, रस्त्यांची नावे जातिवाचक असल्याची बाब समोर आले. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा व सुधारणा निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने ही जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबत समाजकल्याण विभागाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विविध समित्या स्थानिक स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध समित्या गठित केल्या आहेत.

पालिका आयुक्तांसोबत बैठक

नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या शहरी क्षेत्रातील 19 जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात 324, धुळे जिल्हा 11, नंदुरबर जिल्हा 75, जळगाव जिल्हा 28, अहमदनगर जिल्ह्यात 68 अशी एकूण पाचशेहून अधिक नावे बदलण्यात आली आहेत. विभागातील शहरी भागात महानगरपालिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंर्तगत घडलेल्या गुन्हयांच्या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला. सदर अधिनियमांतर्गत गेल्या तीन महिन्यातच्या कालावधीत घडलेल्या गुन्हांचा तपशील जिल्हावार आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांना देण्यात आलेले अर्थसहाय्य व त्यासंदर्भात करण्यात येत असलेली उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे गमे यांनी यावेळी सांगतिले .

विभागातील जिल्हाधिकारी उपस्थित

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय दक्षता व नियंत्रण, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या समितीची बैठक व तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ व इतर अनुषंगिक विषयांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. या बैठकीला दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगर येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळे येथून जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नंदुरबार येथून जिल्हाधिकारी महेश पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

इतर बातम्याः

Nashik| आणखी एका ST कर्मचाऱ्याची आत्महत्या; कमी पगारामुळे उचलले टोकाचे पाऊल!

Nashik| मोदी सरकार झुकले, राष्ट्रवादी भवनासमोर झळकले बॅनर, कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव!

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.