महाविकासआघाडी फुल्ल जोशात; पुण्यात निकालाआधीच झळकले अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स

यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun lad) यांनी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

महाविकासआघाडी फुल्ल जोशात; पुण्यात निकालाआधीच झळकले अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 5:09 PM

पुणे : राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार या निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. यामध्ये पुणे पदवीधर (Pune constituency) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun lad) यांनी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख (BJP Sangram Deshmukh) पिछाडीवर आहेत. अशात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत. (In Pune constituency Arun Lad is in the lead a victory banner before the results)

पुण्यात सारसबाग चौकात पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमोल ननावरे यांनी हे बॅनर लावले आहेत. निकाल येण्यास जवळपास 40 तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादीने अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पहिला कल हाती येण्यास संध्याकाळचे 6 वाजण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत वैध आणि अवैध मतं बाजूला करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे संध्याकाळी पहिला कल हाती येईल आणि मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास 36 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्यातरी हाती आलेल्या निकालांनुसार, अरुण लाड हे आघाडीवर आहेत. त्यामुळे आता ही चुरस आणखी वाढणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया:

– सुरवातीला पाचही जिल्ह्यातील मत पत्रिका एकत्र केल्या जाणार

– त्यानंतर वैध- अवैध मत वेगळी करणार

– नंतर वैध मतांच्या मतपत्रिकेचे गठ्ठे केले जाणार

– त्यानंतर पहिल्या पसंतीची मत मोजणी सुरु होणार

– पहिल्या फेरीत जर पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल अवलंबून

इतर बातम्या – 

MLC Election Result | नागपूर, औरंगाबादेत विधानपरिषदेच्या पदवीधर,शिक्षक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

Nagpur | नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात

(In Pune constituency Arun Lad is in the lead a victory banner before the results)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.