नगरमध्ये ‘वळूं’चा रँम्पवॉक, 'गुरु' नंबर वन

अहमदनगर : आतापर्यंत तुम्ही रँम्पवॉक करणाऱ्या अनेक सुंदर मॉडेल्स पाहिल्या असतील, मात्र कधी वळूला रँम्पवॉक करताना पाहिलंय का? अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथे चक्क वळूच रँम्पवॉक आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक ठिकाणाहून वळू आले होते. चक्क वळू मैदानात उतरणार असल्याने गावात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती. वळूंचं रँम्पवॉक सुरु झाले. तसेच उपस्थितांचंही त्यांनी मनोरंजन …

नगरमध्ये ‘वळूं’चा रँम्पवॉक, 'गुरु' नंबर वन

अहमदनगर : आतापर्यंत तुम्ही रँम्पवॉक करणाऱ्या अनेक सुंदर मॉडेल्स पाहिल्या असतील, मात्र कधी वळूला रँम्पवॉक करताना पाहिलंय का? अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथे चक्क वळूच रँम्पवॉक आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक ठिकाणाहून वळू आले होते. चक्क वळू मैदानात उतरणार असल्याने गावात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती. वळूंचं रँम्पवॉक सुरु झाले. तसेच उपस्थितांचंही त्यांनी मनोरंजन केलं. या स्पर्धेत इगतपुरीच्या गुरु नावाच्या वळूने बाजी मारली आहे.

खास करुन डोंगर दऱ्यात शेती करताना तसेच पावसाचं प्रमाण जास्त आहे अशा भागात अधिक कार्यक्षमतेची जनावर असणं शेतकरऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक आहेत. कोणत्याही ऋतूमध्ये डांगी जातीची जनावरे आदीवासी शेतकरऱ्यांसाठी वरदान ठरली आहेत. डांगी जातीच्या वळुला मोठी मागणी असल्याने या जातीची पैदावार वाढावी, त्यास प्रोत्साहान मिळावं हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू होता.

राज्यभरातून मोठया प्रमाणात शेतकरी आपली जनावर घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. तर स्पर्धेत चॅम्पियन ठरलेल्या वळूंना पारितोषिके, प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. या ठिकाणी चॅम्पियन ठरलेल्या वळूला दिल्लीत एक ते पाच लाख रुपये असा विक्रमी भाव मिळत असल्याचे गावच्या सरपंच हेमलता पिचड यांनी सांगितले

या स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक डांगी जनावर सामिल होते. यामध्ये आदत, दोनदाती, चारदाती, आठदाती वळूंसह उत्कृष्ट कालवड, गोरा, गाय आदी प्रकारातील जनावरांनीही सहभाग नोंदवला होता. प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक देण्यात आले तर सर्व प्रकारात चॅम्पियन ठरला, तो इगतुरी तालुक्यातील धामणी गावच्या अंकुश गोरख भोसले यांचा गुरु नावाचा वळू, तर उपविजेता धामणी याच गावातील रामदल भोसले यांचा पपट्या ठरला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *