अनुसूचित जमातीत समावेश करा, नागपुरात हलबा समाजाचं हिंसक आंदोलन

नागपूर : वेगळा विदर्भ आणि हलबा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी युवकांनी शहर बसवर दगडफेक केल्याची घटना उपराजधानी नागपुरात घडली. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या तरुणांनी बसवर दगडफेक केली. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. दगडफेकीमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपासून …

अनुसूचित जमातीत समावेश करा, नागपुरात हलबा समाजाचं हिंसक आंदोलन

नागपूर : वेगळा विदर्भ आणि हलबा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी युवकांनी शहर बसवर दगडफेक केल्याची घटना उपराजधानी नागपुरात घडली. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या तरुणांनी बसवर दगडफेक केली. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

दगडफेकीमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपासून सुरु असलेल्या याच उपोषणाच्या ठिकाणी विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांची जाहीर सभा आहे. मराठा समाजानंतर आता विदर्भात हलबा समाजही आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालाय. हलबा समाजाने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय.

आरक्षणाचा प्रश्न फडणवीस सरकारची पाठ सोडताना दिसत नाहीये. राज्यात मराठा आरक्षणावर सध्या तोडगा काढण्याचं काम सुरु आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. धनगर समाजाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्यातच आता फडणवीस सरकारला हलबा समाजाने धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या काळात आपल्या मागण्यांसाठी समाजातील विविध घटकांचे आंदोलनं होतात. नागपुरातील आंदोलनही आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी होतं. पण पाच दिवस उपोषण करुनही दुर्लक्ष झाल्याने हलबा समाजाने दगडफेक केली, ज्यात सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं.

दरम्यान, हलबा समाजाने आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मागच्या वर्षी नागपुरात याच मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. काँग्रेस सरकारकडून आमच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं, त्यामुळे भाजप सरकारने तरी मागण्यांकडे लक्ष द्यावं, अशी मागणी गेल्या वर्षीच्या आंदोलनात करण्यात आली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *