महाराष्ट्रात उष्णतेची लाट, पारा 40 अंशापार

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. महाबळेश्वर आणि कोकण वगळता इतर सर्व ठिकाणी तापमान 40 अंशापार पोहोचले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 26 एप्रिल रोजी अकोल्यात 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील किमान तापमानासोबतच […]

महाराष्ट्रात उष्णतेची लाट, पारा 40 अंशापार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. महाबळेश्वर आणि कोकण वगळता इतर सर्व ठिकाणी तापमान 40 अंशापार पोहोचले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 26 एप्रिल रोजी अकोल्यात 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही लक्षणीय वाढ होत आहे. मात्र येत्या 29 एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपूरी, परभणी या ठिकाणी तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला गेला. मध्य महाराष्ट्रात म्हणजेच अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर या विविध जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये तापमानाने चाळीशी गाठली. त्याशिवाय कोकणातही उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेला.

शुक्रवारी पुण्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या 10 वर्षातील पुण्यातील हे सर्वात उच्चांकी तापमान आहे. पुण्यात 23.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईतही वाढत्या तापमानामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत. शुक्रवारी मुंबईत 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

महाराष्ट्रातील तापमानाची नोंद :

  • अकोला –  46.4 अंश सेल्सिअस
  • चंद्रपूर – 45.6 अंश सेल्सिअस
  • अमरावती – 45.4 अंश सेल्सिअस
  • नागपूर – 45.2 अंश सेल्सिअस
  • अहमदनगर – 44.9 अंश सेल्सिअस
  • जळगाव – 44.4 अंश सेल्सिअस
  • सोलापूर – 44.3 अंश सेल्सिअस
  • उस्मानाबाद – 43.8 अंश सेल्सिअस
  • सांगली – 43 अंश सेल्सिअस
  • पुणे – 42.6 अंश सेल्सिअस
  • नाशिक – 41.7 अंश सेल्सिअस
  • सातारा – 41.6 अंश सेल्सिअस
  • कोल्हापूर – 41 अंश सेल्सिअस
  • महाबळेश्वर – 36 अंश सेल्सिअस
  • मुंबई – 34 अंश सेल्सिअस
  • रत्नागिरी – 33.2 अंश सेल्सिअस

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.