महिलांसाठी रेल्वेत आता खास ‘Talk Back’ बटण

मुंबई : भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांच्या सुविधांसाठी नवनवीन योजना आणत असते. प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास हा अधिक सोयिस्कर कसा करता येईल यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत असते. रेव्ले प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेला बघता गाड्यांच्या डब्यांमध्ये ‘Talk Back’ बटणची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या ही सुविधा पायलट प्रोजेक्ट तत्वावर चालवली जात आहे. जर हा प्रकल्प यशस्वी ठरला …

महिलांसाठी रेल्वेत आता खास ‘Talk Back’ बटण

मुंबई : भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांच्या सुविधांसाठी नवनवीन योजना आणत असते. प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास हा अधिक सोयिस्कर कसा करता येईल यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत असते. रेव्ले प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेला बघता गाड्यांच्या डब्यांमध्ये ‘Talk Back’ बटणची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या ही सुविधा पायलट प्रोजेक्ट तत्वावर चालवली जात आहे. जर हा प्रकल्प यशस्वी ठरला तर सर्व गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.

यापूर्वी 2016 मध्ये रेल्वेने महिलांच्या डब्यात पायलट प्रोजेक्ट तत्वावर ‘Talk Back’ बटणची सुविधा सुरु केली होती. यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये अनेक गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात आली होती.

‘Talk Back’ बटण काय आहे?

पश्चिम रेल्वेने लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये ‘Talk Back’ बटणची सुविधा सुरु केली आहे. याअंतर्गत महिला प्रवासी कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये गाडीचा गार्ड आणि मोटर मनशी ‘Talk Back’ बटणच्या सहाय्याने संपर्क साधू शकते. आतापर्यंत पश्चिम रेल्वेकडून 70 पेक्षा जास्त महिला डब्यांमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

या सुविधेचा चुकीचा वापर होऊ नये, यासाठी रेल्वेने रेकॉर्डिंगचीही व्यवस्था केली आहे. गार्ड आणि मोटरमनशी झालेल्या संवादाची रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच, कुठल्या दुर्घटनेच्या परिस्थितीत या संवादाचा पुराव्याच्या रुपात वापर होऊ शकतो.

एकीकडे, संबंधित महिला आणि गार्ड किंवा मोटर मनशी झालेला संवाद रेकॉर्ड केला जातो. तर, दुसरीकडे डब्यामध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने या बटणवर पहारा ठेवला जाणार आहे.

भारतीय रेल्वेने प्रवासी महिलांच्या सुरक्षेकरिता उचलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. रेल्वेच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सोयिस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *