दिल्लीहून चीनला विशेष विमान, कोरोना वायरसमुळे अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतणार

भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी दिल्लीहून पाठवलं जाणारं विमान उतरवण्याची परवानगी चीन सरकार देणार आहे

दिल्लीहून चीनला विशेष विमान, कोरोना वायरसमुळे अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतणार

पिंपरी चिंचवड : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) थैमानामुळे चीनमध्ये अडकलेले 27 भारतीय विद्यार्थ्यी लवकरच मायदेशी परतणार आहेत. दिल्लीतून एक विशेष विमान चीनला रवाना होणार आहे. या विमानाने महाराष्ट्रातील सात जणांसह हुबे विद्यापीठाचे सर्व भारतीय विद्यार्थी आपल्या मूळगावी परतण्याची आशा (Indian Students Stuck in China) आहे.

दिल्लीहून पाठवलं जाणारं विमान आपल्या विमानतळावर उतरवण्याची परवानगी चीन सरकार देणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडमधील देवकाटे कुटुंबीयांनी दिली आहे. मुलगा जयदीप देवकाटे याच्याशी कुटुंबाचं नुकतंच बोलणं झालं.

भारतीय विमान आज रात्री (शुक्रवारी) चीनच्या विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर एका बसने जयदीपसह 27 भारतीय विद्यार्थ्यांना विमानतळावर आणलं जाईल. ते विमानात बसताच विमान भारताच्या दिशेने रवाना होईल, अशी माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचं देवकाटे कुटुंबीयांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं.

चीनमधील हुआन शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर सियानिग गावात ‘हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’मध्ये भारतीय विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. 27 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, यवतमाळ, गडचिरोली, नांदेडच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्याभरापासून सियानिग गावातील काही नागरिकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे हुबे विद्यापीठाने सत्तावीस भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यास मनाई (Indian Students Stuck in China) केली होती.

विद्यार्थ्यांकडे असलेलं जेवणाचं साहित्यही संपायला आलं होतं. सातही जणांनी आपापल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती.

हुबे विद्यापीठात अडकलेले महाराष्ट्रीय विद्यार्थी

1. सलोनी त्रिभुवन, पुणे
2. जयदीप देवकाटे, पिंपरी चिंचवड, पुणे
3. आशिष गुरमे, लातूर
4. प्राची भालेराव, यवतमाळ
5. भाग्यश्री उके, भद्रावती, चंद्रपूर
6. सोनाली भोयर, गडचिरोली
7. कोमल जल्देवार, नांदेड

Indian Students Stuck in China

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *