‘तो’ व्हिडीओ यूट्यूबवर नाही, इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा

वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध नसल्याचं सायबर सेलच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

'तो' व्हिडीओ यूट्यूबवर नाही, इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 1:37 PM

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना एक मोठा दिलासा (Indurikar Maharaj controversy) मिळाला आहे. वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध नसल्याचं सायबर सेलच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांवर सध्या कुठलीही कारवाई होणार नाही.

अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act)  समितीने सायबर सेलकडे (Indurikar Maharaj controversy) इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिलं होतं. नगर सायबर सेलकडून याबाबत समितीला अहवाल देण्यात आला आहे. वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध नसल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांवर सध्या तरी पीसीपीएनडी समितीकडून कसलीही कारवाई होणार नाही. त्यामुळे तूर्तास तरी इंदोरीकर महाराजांवर कोणतीही कारवाई होणार नाही.

प्रकरण काय?

इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर महाराज म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”

इंदोरीकरांची दिलगिरी

सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली होती. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

इंदोरीकरांना नोटीस

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj controversy) अडचणीत सापडले आहेत. पीसीपीएनडीटीए कायद्याअंतर्गत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे. या वादानंतर इंदोरीकर महाराज अत्यंत उद्विग्न असल्याचं दिसलं होतं. बीड आणि अहमदनगरमध्ये झालेल्या कीर्तन सोहळ्यात, इंदोरीकर महाराजांनी आता कीर्तन बास, शेती करु असं म्हटलं होतं.

कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करुन अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदोरीकर महाराजांना ओळखलं जातं. अनोख्या रोखठोक शैलीमुळे इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होत असते. पण, इंदोरीकर महाराजांनी थेट पुत्रप्राप्तीसंदर्भात वक्तव्य केल्यानं, वादाला तोंड फुटलं आहे. त्याचा परीणाम आता थेट त्यांच्या कीर्तनांवर होऊ लागला

यूट्यूब चॅनल्सवर खापर

यापूर्वी इंदोरीकर महाराजांनी बीडमधील एका कीर्तन सोहळ्यात वादावर भाष्य करताना, यूट्यूब चॅनल्सवर खापर फोडलं होतं.

“यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदोरीकर संपवायला निघालेत. पण मी बोलतोय हे खरंच आहे. मी कशात सापडेना म्हणून मला गुतवण्याचा (अडकवण्याचा) प्रयत्न सुरु आहे. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली. 26 वर्षे झाली मालक- बायका नाही, पोरगं नाही, रात्रं-दिवस प्रवास कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं गेलं, पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही बी. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला….. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो..आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली.

एवढंच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास.. काड्या करणारी मंडळी ही यूट्यूबवाली मंडळी. यांनीच इंदोरीकरच संपवावा..त्यांना माहीत नाही, यूट्यूब संपेल. यूट्यूबवाल्यांना इंदोरीकराच्या नावाने पैसा मिळाला मोक्कार. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. एक एक लाख लाईक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय (Indorikar Maharaj controversy). पाहाणाऱ्यांची संख्या खूप आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.