भाजप प्रवेशाची चर्चा, कीर्तनात इंदुरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

संगमनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj Kirtan) पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता.

Indurikar Maharaj Kirtan, भाजप प्रवेशाची चर्चा, कीर्तनात इंदुरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

शिर्डी : पूरग्रस्तांना मदत करायला गेलो आणि मीडियाने तीन मिनिटात महाराष्ट्रभर बोंग्या केला, असं म्हणत निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj Kirtan) यांनी कीर्तनात फटकेबाजी केली. संगमनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj Kirtan) पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता. पण यानंतर इंदुरीकर महाराज राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

या चर्चांनंतर इंदुरीकर महाराजांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. इंदुरीकर महाराज हे संगमनेरातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात भाजपकडून लढणार असल्याचाही दावा करण्यात आला. पण आमच्या संगमनेरचं नेतृत्त्व सुसंस्कृत आणि विकासात्मक असल्याचं सांगत आपण कधीही राजकारणात येणार नाही, असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.

VIDEO : इंदुरीकर महाराजांचं कीर्तन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *