इंदुरीकर महाराज वादावरुन तृप्ती देसाईंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना अश्लील शिवीगाळ देण्यात आली आहे.

Indurikar Maharaj Supporter threat Trupti Desai, इंदुरीकर महाराज वादावरुन तृप्ती देसाईंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना अश्लील शिवीगाळ देण्यात आली आहे (Indurikar Maharaj Supporter threat Trupti Desai). तसेच नग्न करुन मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. यात इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांसह शिवसेनेच्या अहमदनगरमधील महिला पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. या धमक्यांनंतर तृप्ती देसाई यांनी राज्याच्या गृहखात्यावर आणि पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. देसाई यांनी नागडं करण्याची धमकी देणाऱ्यांना फक्त ठिकाण आणि वेळ सांगा, असं प्रत्युत्तरही दिलं.

तृप्ती देसाई यांनी या धमक्यांनंतर आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात महिलांचा वारंवार अपमान होतोय. त्यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचंही उल्लंघन केलं आहे. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली असता त्यांचे समर्थक वारंवार अश्लील भाषेत टीका करत आहेत. अश्लील शिवीगाळही करत आहेत. त्यांचे अनेक समर्थक मला नागडं करून मारण्याची धमकी देत आहेत. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी असल्याचं सांगणाऱ्या स्मिता अष्टेकर यांनी देखील अशाच भाषेत अश्लील शिवीगाळ करत नग्न करुन मारण्याची धमकी दिली आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.”


खरंतर द्रौपदीला त्या काळात हे सर्व सहन करावं लागलं होतं. सावित्रीबाई फुलेंवर देखील शेण फेकलं गेलं. आता 21 व्या शतकात महिला सबलीकरण आणि स्त्री पुरुष समानतेसाठी समाज आवाज उठवतो आहे. तेव्हाही अशाच कमेंट्स आणि अशा धमक्या येत असतील, तर महाविकासआघाडी सरकारचं गृह खातं काय करतंय? पोलीस काय करत आहेत? जे कुणी अशा धमक्या देत आहेत त्यांचं महाराजांनी खूप चांगलं प्रबोधन केलं आहे. हे यावरुनच कळतं आहे. फक्त तुम्हाला खरंच मला नागडं करुन मारायचं असेल, तर कुठं यायचं याची वेळ आणि ठिकाण सांगा. मी यायला तयार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र 21 व्या शतकात महिलांसोबत काय होतंय हे नक्कीच या डोळ्यांनी पाहिल, असंही तृप्ती देसाई यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ :


Indurikar Maharaj Supporter threat Trupti Desai

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *