इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा : बाळासाहेब थोरात

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या मंचावर दिसल्यापासून आणखी चर्चेत आले आहेत.

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा : बाळासाहेब थोरात

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Nivrutti Maharaj Indurikar) हे भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या मंचावर दिसल्यापासून आणखी चर्चेत आले आहेत. निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार अशीही चर्चा रंगली, पण स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त फेटाळलं. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली.

“समाजातील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवणारे इंदुरीकर महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा हक्क आहे, त्यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांनी पत्रक काढून राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे. समाजप्रबोधन करण्याचं त्यांचं मोठं काम असून त्यामुळे अनेक चुकीच्या प्रथा बंद झाल्या आहेत. ”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

जागावाटप ठरलं

125, 125 आणि 38 असा आघाडीचं जागावाटप ठरलं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. वेळ आल्यास आमच्या 125 जागांमधून मित्रपक्षांना जागा देण्याची आमची तयारी आहे. मनसेला आघाडीत घेण्याची अथवा न घेण्याची कोणतीच चर्चा नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

वाचा : इंदुरीकर महाराज निवडणूक लढवण्याची चर्चा, थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भिडणार? 

निळवंडे धरणासाठी 1200 कोटी दिलं म्हणणारे काय काम झालं ते सांगावं. निवडणुकीच्या तोंडावर तुटपंजं काम झालं. भाषणे मोठी करायची, काम मात्र काहीच नाही अशी सरकारमधील नेत्यांची अवस्था आहे, अशी टीका थोरातांनी केली.

बेरोजगारीने जनता हवालदिल झाली आहे, जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जिवनाशी निगडीत मुद्दे , शेतकरी आत्महत्या , कारखानदारी टिकावी , रोजगार वाढावा हाच आमचा निवडणुकीचा अजेंडा असेल, अस थोरात म्हणाले.

संबंधित बातम्या 

इंदुरीकर महाराजांनी राजकारणात यावं का? संगमनेरातील लोकांना काय वाटतं?   

समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे, कधीही राजकारणात येणार नाही : इंदुरीकर महाराज  

इंदुरीकर महाराज निवडणूक लढवण्याची चर्चा, थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भिडणार? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *