पत्नीच्या नोकरीच्या ठिकाणाचं अंतर कमी दाखवलं, 32 शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या 32 शिक्षकांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. बदलीसाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहराजवळ बदली करण्यासाठी यापैकी काही शिक्षकांनी पत्नीच्या नोकरीची खोटी कागदपत्र दिली होती, तर काहींनी पत्नीच्या नोकरीच्या ठिकाणाचं कमी अंतर दाखवलं होतं. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या या 32 शिक्षकांची आता विभागीय चौकशी सुरु …

पत्नीच्या नोकरीच्या ठिकाणाचं अंतर कमी दाखवलं, 32 शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या 32 शिक्षकांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. बदलीसाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहराजवळ बदली करण्यासाठी यापैकी काही शिक्षकांनी पत्नीच्या नोकरीची खोटी कागदपत्र दिली होती, तर काहींनी पत्नीच्या नोकरीच्या ठिकाणाचं कमी अंतर दाखवलं होतं.

प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या या 32 शिक्षकांची आता विभागीय चौकशी सुरु झाली आहे. या शिक्षकांची एक वेतनवाढ कपात आणि जिल्ह्यातील शेवटच्या शाळेत बदली करण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या वेळी खोटी माहिती भरणे आता या शिक्षकांना चांगलंच महागात पडणार आहे. 32 शिक्षकांनी आपली चूक मान्य केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिलीय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *