नागपुरात ‘या’ दोन वीज केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांटची शक्यता तपासा, मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जामंत्र्यांना सूचना

सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही केंद्राची पाहणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली. उद्या सकाळी यासंदर्भातील अहवाल सादर करणार आहे. oxygen power plants Nagpur

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:12 PM, 19 Apr 2021
नागपुरात 'या' दोन वीज केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांटची शक्यता तपासा, मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जामंत्र्यांना सूचना
cm uddhav thackeray

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोरोना उद्रेक नियंत्रित करण्यासाठी प्रसंगी महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा विद्युत केंद्रातील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनची उपलब्धता करता येईल का, याची चाचपणी करा,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिलेत. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी बेडची व्यवस्था करता येईल का, याची शक्यता तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊतांना दिलेत. सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही केंद्राची पाहणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली. उद्या सकाळी यासंदर्भातील अहवाल सादर करणार आहे. (Investigate the possibility of oxygen plant in two power plants in Nagpur, maharashtra CM instructs Energy Minister)

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण

नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक प्रचंड वाढला असून, दररोज मृत्यू संख्येचा आकडा वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय हॉस्पिटल, तसेच कोविड केअर सेंटरमध्ये बेडची उपलब्धता, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना लाट कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व बेडची आवश्यकता लागणार आहे.

प्रत्यक्ष कृती करताना ही बाब शक्य आहे का?

दरम्यान, खापरखेडा आणि कोराडी येथील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करताना ही बाब शक्य आहे का..? यासंदर्भातील तांत्रिक आणि प्रशासकीय बाजू तपासण्यासाठी सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वतः दोन्ही वीज केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंता शरद भगत, कोराडी येथील मुख्य अभियंता राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर होते. उद्या सकाळी या शक्यतेसंदर्भात पालकमंत्र्यांमार्फत राज्य शासनाला अहवाल दिला जाणार आहे.

नागपूरजवळील वीजनिर्मिती केंद्र पर्याय होऊ शकतात काय?

सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि जिल्हा प्रशासनाची संपर्क साधत ऑक्सिजन प्लांटच्या संदर्भात नागपूरजवळील वीजनिर्मिती केंद्र पर्याय होऊ शकतात काय? याची विचारणा केली. वीज केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांसाठी ओझोन प्लँटची आवश्यकता असते. या ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनची उपलब्धता शक्य आहे. सोबतच वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात शहरात रुग्ण संख्येचा स्फोट झाल्यास ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या ठिकाणाजवळच अर्थात या दोन्ही केंद्रांमध्ये तात्पुरती कोविड केंद्र उभारली जाऊ शकतात काय, याबद्दलची देखील चाचपणी करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोराडी वीज निर्मिती केंद्रात 390 क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा ओझोन प्लांट कार्यरत

कोराडी वीज निर्मिती केंद्रात 390 क्युबिक मीटर प्रति तास क्षमतेचा ओझोन प्लांट कार्यरत आहे तर खापरखेडा येथे 50 क्युबिक मीटर प्रति तास क्षमतेचा ओझोन प्लांट कार्यरत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता या ठिकाणी शक्य असून उद्या सकाळी जिल्हा प्रशासन या संदर्भात आपला अहवाल पालकमंत्र्यांना देणार आहे.

संबंधित बातम्या

प्रशासनाकडून मान्यता नसताना कोरोना हॉस्पिटल सुरु, काही रुग्णांचा मृत्यू, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

1 मेपासून तरुणांनाही लस; नोंदणी कशी कराल, खर्च किती?, एका क्लिकवर सर्व माहिती

Investigate the possibility of oxygen plant in two power plants in Nagpur, maharashtra CM instructs Energy Minister