गिरीश महाजनांसोबत भेटीनंतर विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेतली. पण ही भेट राजकीय नव्हती, असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलंय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या भेटीत केल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. शिवाय नगर जिल्ह्यातील पाण्याचा मुद्दा गिरीश महाजनांसमोर मांडल्याचंही ते म्हणाले. सध्या विविध मंत्री …

radhakrishna vikhe patil girish mahajan, गिरीश महाजनांसोबत भेटीनंतर विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेतली. पण ही भेट राजकीय नव्हती, असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलंय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या भेटीत केल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. शिवाय नगर जिल्ह्यातील पाण्याचा मुद्दा गिरीश महाजनांसमोर मांडल्याचंही ते म्हणाले.

सध्या विविध मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे दुष्काळी दौरे सुरु आहेत. पण दुष्काळावरुन कुणीही राजकारण करु नये असं आवाहन विखे पाटलांनी केलंय. शासकीय पातळीवर सध्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी योजना सुरुच आहेत, पण नगर जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत विखे पाटलांनी गिरीश महाजनांशी चर्चा केली.

दरम्यान, ही भेट राजकीय नव्हती, असं सांगत काँग्रेसमधील राजकीय भूमिकेबाबत अजून काहीही ठरवलेलं नाही, असंही विखे पाटील म्हणाले. गिरीश महाजनांना विरोधी पक्षातील नेत्यांनी भेटणे म्हणजे हे सूचक संकेत मानले जातात. पण विखे पाटलांनी याबाबत नकार दिलाय. गेल्या अनेक दिवसांपासून विखे पाटील भाजपात येणार असल्याच्या चर्चा आहेत. पण विखे पाटलांनी अजून त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आणि नगरमधून निवडणूक लढवली. पक्षाने मुलाला तिकीट न दिल्यामुळे नाराज असलेले विखे पाटीलही लवकरच पक्ष सोडतील, असा अंदाज लावला जात होता. कारण, विखे पाटलांनी जाहीरपणे शिवसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावत काँग्रेसच्याच विरोधात प्रचार केला होता.

व्हिडीओ पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *