मानवंदना देताना वृद्धाच्या छातीत गोळी लागली, जागीच मृत्यू

जळगाव : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या वृद्ध वडिलांच्या मृत्यूनंतर अग्नीडाग देण्यापूर्वी मानवंदना म्हणून बंदुकीने हवेत फायरिंग केली. परंतु बंदूक अचानक लॉक झाली. बंदूक आडवी करून तपासात असताना अचानक एक गोळी शेजारी उभे असलेल्या एका वृद्धाच्या सरळ छातीत घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ही घटना आहे. पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक …

मानवंदना देताना वृद्धाच्या छातीत गोळी लागली, जागीच मृत्यू

जळगाव : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या वृद्ध वडिलांच्या मृत्यूनंतर अग्नीडाग देण्यापूर्वी मानवंदना म्हणून बंदुकीने हवेत फायरिंग केली. परंतु बंदूक अचानक लॉक झाली. बंदूक आडवी करून तपासात असताना अचानक एक गोळी शेजारी उभे असलेल्या एका वृद्धाच्या सरळ छातीत घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ही घटना आहे.

पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर (ह.मु.नाशिक) यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (वय 85) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली. यावेळी श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्यासाठी मोहकर यांचा मुलगा दीपक यांनी आपल्या बंदुकीमधून हवेत फायर केले.

दोन फायर व्यवस्थित झाले, परंतु तिसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक यांनी बंदूक आडवी करून तिला बघत असतांनाच अचानक गोळी बाहेर निघाली आणि अंत्ययात्रेत आलेले तुकाराम वना बडगुजर (वय 60, रा. पिंपळगाव हरेश्वर,ता.पाचोरा) यांच्या छातीत घुसली. या दुर्घटनेत तुकराम बडगुजर हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले.

नातेवाईकांमध्ये याबाबत समजोत्या संदर्भात चर्चा सुरु होती. दरम्यान, फायर करण्यासाठी परवानगी काढली होती का? एअरगन नेमकी कोणी चालवली याबाबत संभ्रम निर्माण होता. कारण काही जण दीपक यांनी गोळी चालवली असे सांगत होते. तर कुणी विठ्ठल मोहकर यांनी फायर केल्याचे म्हणत होते. मयत बडगुजर यांचे दोन्ही मुलं पोलीस खात्यात असल्याची माहिती आहे. यातील एक मुलगा जळगाव शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत आहे. तर ज्याने गोळीबार केला, त्या दीपक मोहकर यांची सिक्युरिटी एजन्सी असल्याची माहिती आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *