‘सुवर्णनगरी’ जळगावचे प्रसिद्ध सराफ रतनलाल बाफना कालवश

रतनलाल बाफना यांनी 1988 मध्ये सराफ बाजारातच 'नयनतारा' हे भव्य शोरुम सुरु केले होते.

'सुवर्णनगरी' जळगावचे प्रसिद्ध सराफ रतनलाल बाफना कालवश
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 5:52 PM

जळगाव : ‘सुवर्णनगरी’ जळगावमधील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक रतनलाल चुनीलाल बाफना (Ratanlal Chunilal Bafna) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पाडवा-भाऊबीजेच्या दिवशी (सोमवार 16 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जळगावातील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. (Jalgaon Famous Jeweler Ratanlal Chunilal Bafna passed away)

रतनलाल चुनीलाल बाफना यांच्या पार्थिवावर जळगाव शहराजवळ असलेल्या कुसुंबा येथील त्यांच्या गोशाळेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती बाफना कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.

मूळचे राजस्थानातील भोपालगढ येथील बाफना घराणे व्यवसाय निमित्ताने जळगावात स्थायिक झाले होते. सराफ व्यवसायात रतनलाल बाफना यांनी विशेष नावलौकिक मिळवला.

वयाच्या 19 व्या वर्षी दहावीचे शिक्षण आणि धडाडी वृत्तीसह ते घराबाहेर पडले. आपले नशिब आजमावण्यासाठी 1954 मध्ये ते जळगावात आले. सुरुवातीला लहानमोठ्या नोकऱ्या करत त्यांनी व्यवसायात उडी घेतली.

रतनलाल बाफना यांनी 1988 मध्ये सराफ बाजारातच ‘नयनतारा’ हे भव्य शोरुम सुरु केले होते. त्यानंतर चांदीच्या दागिन्यांसाठी स्वतंत्र असे ‘पारसमहल’ शोरुम सुरु केले. बाफना यांचा व्यवसाय त्यानंतर विस्तारत गेला. जळगावसह मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा महानगरांमध्ये त्यांनी ‘आर. सी. ज्वेलर्स’ नावाने सुवर्णपेढ्या सुरु केल्या होत्या.

रतनलाल बाफना हे शाकाहार प्रणेते म्हणून परिचित होते. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असे. सामाजिक कार्यासोबत त्यांना गोसेवेची विशेष आवड होती. वैद्यकीय, शिक्षण क्षेत्रात ते नेहमी मदतीचा हात द्यायचे. तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी ते अनेक उपक्रम राबवत असत. वाजवी दरात गरजूंना अन्न मिळावे यासाठी ‘क्षुधाशांती’ केंद्रात योगदान दिले. तर तहान भागवण्यासाठी जलमंदिर उभारले. (Jalgaon Famous Jeweler Ratanlal Chunilal Bafna passed away)

संबंधित बातम्या :

लक्ष्मी पूजनाला 400 रुपयांनी सोनं महागलं

औक्षणासाठी शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेची आख्यायिका जाणून घ्या

मोठा भाऊ कोरोनाने गेला, आघातातून सावरत महापौर पेडणेकरांची ऑनलाईन भाऊबीज

(Jalgaon Famous Jeweler Ratanlal Chunilal Bafna passed away)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.