जळगावात वाघूर धरणाच्या पाण्यात तीन मुलं बुडाली, पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ असणाऱ्या वाघूर धरणाच्या पाटाच्या पुलाच्या चारीतील वाहत्या पाण्यात तीन मुलं पोहायला गेलं होतं.

जळगावात वाघूर धरणाच्या पाण्यात तीन मुलं बुडाली, पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ असणाऱ्या वाघूर धरणाच्या (Jalgaon Three Boys Drowned) पाटाच्या पुलाच्या चारीतील वाहत्या पाण्यात तीन मुलं पोहायला गेली होती. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. हे तिघेही नशिराबाद येथील भवानी नगर येथील असून या मुलांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे (Jalgaon Three Boys Drowned).

जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. त्यामुळे नद्या, नाले, धरणे तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे पोहायला आणि फिरायला जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. वाघूर धरणदेखील पूर्णपणे भरलेले असल्यामुळे तेथे अनेकजण पर्यटनासाठी आणि पोहायला जातात.

नशिराबाद येथील भवानी नगरचे रहिवासी मोहित दिलीप नाथ (वय 12), आकाश विजय जाधव (वय 13), ओम सुनिल महाजन (वय 11) हे तिघेही वाघूर धरणावर पोहायला गेले होते. दरम्यान, सुभाष वाणी यांच्या शेताजवळ पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. जवळ असणाऱ्या लोकांनी पोलिसांना आणि ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार, नशिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी पहिले मोहितचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनतर वाहून जात असताना आकाश आणि ओम यांचा मृतदेह मिळाला. तिघेही जणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी रवाना केले. सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Jalgaon Three Boys Drowned

संबंधित बातम्या :

राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेरात कैद

भावाला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ नदीत उतरला, भिवंडीत मासे पकडण्यासाठी गेलेले दोन भाऊ बुडाले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *