‘राज्यात 100 टक्के महायुतीचं सरकार येणार’, अनिल देशमुख हे काय बोलून गेले? चूक लक्षात येताच…

जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत बोलताना माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून चूक झाली. महाविकास आघाडी ऐवजी राज्यात शंभर टक्के सरकार हे महायुतीचे येणार, असं अनिल देशमुख म्हणाले.

'राज्यात 100 टक्के महायुतीचं सरकार येणार', अनिल देशमुख हे काय बोलून गेले? चूक लक्षात येताच...
अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 7:47 PM

जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत बोलताना माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून चूक झाली. महाविकास आघाडी ऐवजी राज्यात शंभर टक्के सरकार हे महायुतीचे येणार, असं अनिल देशमुख म्हणाले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झालेली चूक लक्षात आणून दिल्यावर अनिल देशमुख यांनी चूक सुधारली. चूक लक्षात आल्यावर ती सुधारत अनिल देशमुख म्हणाले राज्यात 100 टक्के महाविकास आघाडीचे सरकार येणार. महाविकास आघाडी ऐवजी अनिल देशमुख यांच्या तोंडून महायुतीचे सरकार येणार असे शब्द निघाले. राज्यात शंभर टक्के सरकार महायुतीच येणार असं भाषणात बोलताना महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख चुकले. माजी मंत्री अनिल देशमुख आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाषण करताना त्यांच्याकडून बोलताना ही चूक झाली.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर त्यांनी भूमिका मांडली. “आमच्या पक्षाची न्याय भूमिका आहे. सर्वांना माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बद्दलचा निर्णय शरद पवारांच्या बाजूने देईल, असा आम्हाला विश्वास आहे”, असं अनिल देशमुख म्हणाले.

‘आमच्यात कोणी मोठा भाऊ नाही’

“आमच्यात कोणी मोठा भाऊ नाही. आमच्यात कोणी छोटा भाऊ नाही. जागांबद्दलचा निर्णय महाविकास आघाडीची कोर कमिटी घेईल. सर्वांना वाटतं, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे. मात्र याबद्दलचा निर्णय कोर कमिटी घेते. निवडून येणारे उमेदवार या निकषावर जागांचे वाटप होईल”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुखांचा अनिल पाटील यांना टोला

“लोकसभेची निवडणूक आम्ही एकोप्याने लढलो. एकोप्याने लढल्यामुळे आम्हाला हे हे यश आलं आणि पुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही एकोप्यानेच लढणार असल्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीच्या नुकतेच झालेल्या बैठकीत झाला आहे. मंत्री अनिल पाटील यांनी वक्तव्य करण्यापेक्षा आपल्या पक्षाचं काय ते पाहावं”, असा टोला अनिल देशमुख यांनी मंत्री अनिल पाटील यांना लगावला.

यावेळी अनिल देशमुख यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “आमदार एकनाथ खडसे यांची काय भूमिका आहे ते स्वतः जाहीर करतील. लोकसभेत सुद्धा रोहिणी खडसे यांनी पक्षासाठी काम केलं. मात्र त्यांनी चांगलं काम केलं की नाही त्याबद्दलची ही चर्चा आजच्या बैठकीत होईल. एकनाथ खडसे यांच्या बद्दलचा निर्णय व्हायचा आहे. काय निर्णय होतो ते बघू. आता त्यांची काय भूमिका आहे ते स्वतः जाहीर करतील. त्यांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार?”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.