मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू, त्या भीतीपोटी गिरीश महाजनांना दुसऱ्यांदा कोरोना- एकनाथ खडसे

मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू, त्या भीतीपोटी गिरीश महाजनांना दुसऱ्यांदा कोरोना- एकनाथ खडसे

राज्यात सध्या 50 च्या आसपास नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे, राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा तर धडकी भरवणारा आहे, अशातच आता भाजप आमदार गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, यावरून महजनांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, या भीतीने तर महाजनांनाा कोरोना झाला नाही ना? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.

मोक्का लागण्याच्या भितीने महाजनांना कोरोना?

गेल्या काही दिवसात राजकीय कार्यक्रमही जोरात सुरू होते त्यामुळेच नेत्यांनाही यावेळी कोरोनाने हैराण करून सोडलं आहे, रोज एक दोन नेत्यांना कोरोना झाल्याच्या बतम्या समोर येत आहे, आता गिरीश महाजन यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आल्यानतंर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे, तसेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे. त्यांची प्रकृती, स्वास्थ्य चांगले राहावे. त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी पार्थना करणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.

आधी महाजनांचा वार आता खडसेंचा पलटवार

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना झाला, त्यावेळी काही सवाल उपस्थित करत टीका केली होती, एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते, तेव्हाच कोरोना होतो, असे महाजन म्हणाले होते. त्या टीकेचा समाचार खडसेंनी आता मोके पे चौका मारते घेतला आहे. एकानाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर आधी अंतर्गंत असाणारा जळगावातील नेत्यांचा वाद आता खुल्यापणे समोर आलाय, त्यातूनच हे वार-पलवार आणखी तीव्र झाले आहेत.

Nagpur Surya | नागपुरातील सूर्याचा अस्त; आता बाँब शोधणार कोण? पोलीस दलाला चिंता

Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’ विजेता पदाचा दावेदार उमर रियाझ थेट घराबाहेर!

Video : बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, यूझर्स करतायत सलाम!

Published On - 3:05 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI