जळगाव : चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात; दोन ठार एक जण जखमी

जळगाव : चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात; दोन ठार एक जण जखमी
हिस्सारमध्ये एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू

मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.  चारचाकीने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 14, 2021 | 6:32 AM

जळगाव : मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.  चारचाकीने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीवर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईकडे भरधाव जात असलेल्या तव्हेरा गाडीने दुचाकीला धडक दिली. हा अपघात मालेगाव चाळीसगाव रस्त्यावरील भोलेनाथ वाशिंग सेंटरजवळ घडला. या अपघातामध्ये दुचाकीवर असलेले दोन जण जागीच ठार  झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर चाळीसगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रकाश एकनाथ बाविस्कर रा. (26) फुले नगर चाळीसगाव आणि विजय दगडू मोरे (20)रा. देवळी ता.चाळीसगाव अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर आदित्य श्रावण शहादेव रा.आडगाव तालुका चाळीसगाव  हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

वाहनांचे नुकसान

या अपघातामध्ये दोनही वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान  झाले आहे. भरधाव चारचाकीने धडक दिल्यामुळे दुचाकी पूर्णपणे डॅमेज झाली आहे. तर चारचाकीच्या समोरचा भागा तुटला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही वेळात पुन्हा सुरळीत झाली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या 

Kalyan Murder: कल्याणमधील हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा; मुलानेच केली वडिलांची हत्या

Raigad Crime: माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली, चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच काढला पत्नीचा काटा

Kalyan Crime : दुसऱ्याच्या भांडणात लहान भावाची मध्यस्थी मोठ्या भावाच्या जिवावर बेतली, तरुण गंभीर जखमी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें