“शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने कर्नाटकात जाऊ”; या नेत्याने थेट बोमईंनाच दिला इशारा

सातत्याने हा वाद वाढला पाहिजे अशा पद्धतीने सीमावाद हातळला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने कर्नाटकात जाऊ; या नेत्याने थेट बोमईंनाच दिला इशारा
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 7:24 PM

जळगावः महाराष्ट्र कर्नाटक वाद आता शिगेला पोहचला आहे, त्यामुळे सीमावाद आता चर्चेतून सोडवा अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे कन्नडिगांनी मात्र महाराष्ट्राला डिवचण्याच काम सुरू केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावादाचा प्रश्न आता चिघळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोड करण्यात आली असल्याचे सांगितले.

कन्नडिगांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद उफाळून आणला असल्याने दोन्ही राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले की, प्रांतवाद चिघळला असून त्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलताना आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवरही टीका केली आहे. राज्य सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

सातत्याने हा वाद वाढला पाहिजे अशा पद्धतीने सीमावाद हातळला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

काल कन्नडिगांनी कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केल्यानंतर त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी राज्य सरकारसह कर्नाटकवरही जोरदार हल्ला बोल केला.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र इतका कमजोर नाही की आमच्यावर कन्नडिगांनी हल्ला करावा आणि तो आम्ही सहन करावा असा सूचित इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकाला इशारा दिला होता. यावेळी त्यांनी 48 तासात यावर तोडगा निघाला नाही तर माझ्यासह माझ्या नेत्यांना कर्नाटकात जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर बोलत एकनाथ खडसे यांनी आता थेट इशाराच दिला आहे.

जर शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी जाऊ, आंदोलन करू आणि बोमई यांना माफी मागायला भाग पडू असा जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.